अद्भूत सुवर्ण रामायण..! अयोध्येतील राम मंदिरात होणार सोन्याच्या रामायणाचे दर्शन
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अयोध्येतील राम मंदिरात आता भाविकांना अनोखे सुवर्ण रामायणाचे दर्शन घडणार आहे. तब्बल १.५ विक्वंटल वजनाचे सोन्याचे रामायणाची मंदिरातील गर्भगृहात विधिवत स्थापना करण्यात आली आहे.
सुवर्ण रामायण हे मध्य प्रदेश केडरचे माजी IAS सुब्रमण्यम लक्ष्मीनारायणन आणि त्यांची पत्नी सरस्वती यांनी राम मंदिर ट्रस्टला भेट दिले आहे. मंगळवार, ९ एप्रिल रोजी या रामायणाच्या स्थापनेवेळी लक्ष्मी नारायण आपल्या पत्नीसह अयोध्येतील राम मंदिरात उपस्थित होते.
चेन्नईतील वुम्मीदी बंगारू ज्वेलर्सकडून निर्मिती
सुवर्ण रामायणाची निर्मिती चेन्नईच्या प्रसिद्ध वुम्मीदी बंगारू ज्वेलर्सने केली आहे. राम मंदिरातील गर्भगृहामध्ये रामललाच्या मूर्तीपासून अवघ्या 15 फूट अंतरावर दगडी पीठावर हे सुवर्ण र रामायण ठेवण्यात आले आहे. त्याच्या वर रामाचा चांदीचा पट्टाभिषेक आहे.
सुवर्ण रामायणाचे वैशिष्ट्य
प्रत्येक पान १४ बाय १२ इंच आकाराचे आणि तांब्याचे आहे. ज्यावर राम चरित मानसातील श्लोक कोरलेले आहेत.
10,902 श्लोकांच्या या महाकाव्याच्या प्रत्येक पानावर २४ कॅरेट सोन्याचा मुलामा आहे.
सोनेरी प्रतिकृतीमध्ये अंदाजे 480-500 पृष्ठे आहेत ती 151 किलो तांबे आणि 3-4 किलो सोन्यापासून बनलेली आहे.
प्रत्येक पानासाठी तीन किलो तांबे वापरण्यात आले आहे. या रामायणाचे वजन दीड क्विंटलपेक्षा जास्त आहे.
रामनवमीनिमित्त सलग २० तास दर्शनाची सुविधा
रामनवमीच्या मुहूर्तावर अयोध्येच्या राम मंदिरात 20 तास दर्शनाची सुविधा असेल. ही व्यवस्था १५ ते १७ एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. या काळात जवळून दर्शनाची व्यवस्था रद्द केली जाईल. अयोध्येत 100 ठिकाणी रामनवमीचे थेट प्रक्षेपण एलईडी स्क्रीनवर होणार आहे. 15 ते 18 एप्रिलपर्यंत दर्शनासाठीची पास प्रणाली रद्द करण्यात आली आहे.
हेही वाचा :
Golden Ram Temple : राम मंदिराची सर्वात सूक्ष्म सुवर्ण प्रतिकृती
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा : सरसंघचालक म्हणाले, “भारत स्वबळावर…”
अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी सरकारी तिजोरीतून किती पैसे दिले? CM योगी आदित्यनाथ म्हणाले….
The post अद्भूत सुवर्ण रामायण..! अयोध्येतील राम मंदिरात होणार सोन्याच्या रामायणाचे दर्शन appeared first on Bharat Live News Media.