
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक टॉड फिलिप्स यांच्या ‘जोकर: फोली अ ड्यूक्स’ या चित्रपटाचा ट्रेलर ( Joker 2 Trailer ) आज रिलीज झाला आहे. ‘जोकर: फोली अ ड्यूक्स’ हा हॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. धमाकेदार ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्याची चित्रपटासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात जोकिन फिनिक्स आणि गायिका आणि अभिनेत्री लेडी गागा एका वेगळ्याच अवतारात दिसले आहेत.
संबंधित बातम्या
‘जोकर’च्या सिक्वेलमध्ये लेडी गागा बनणार हार्ले क्वीन
Joker २ : ‘जोकर २’ येतोय; लेडी गागा हार्ले क्वीनच्या भूमिकेत?
लेडी गागाने अडीच मिनिटांत ९ वेळा बदलला ड्रेस (video)
दोन मिनिटे आणि २५ सेकंदाच्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ( Joker 2 Trailer ) सुरूवातीला जोक्विन फिनिक्स आणि लेडी गागा एकमेंकासमोर येताना दिसत आहेत. यानंतर पुढच्या सीनमध्ये ‘मी कोणीही नाही. मला अभिमान वाटेल असे काहीही केलेले नाही. असे म्हटले जाते. यानंतर लेडी गागा आणि जोक्विन एकामेंकासोबत डान्स करतानाही दिसत आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर जोक्विन फिनिक्सचे चाहते खूप आनंदी दिसत आहेत. सोशल मीडियावर त्यांनी कॉंमेन्टसचा पाऊस पाडलाय.
‘जोकर’ हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जोक्विन फिनिक्सने दमदार कामगिरी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चाहते ‘जोकर’ चित्रपटाच्या सिक्वेलची वाट पाहत होते. यानंतर आता ‘जोकर: फोली अ ड्यूक्स’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. यानंतर चित्रपटासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Latest Marathi News ‘जोकर २’ च्या ट्रेलर रिलीज; जोक्विन फिनिक्स- लेडी गागाचा रोमॉन्टिक अवतार Brought to You By : Bharat Live News Media.
