वेध लोकसभेचे : १९९८ काँग्रेसची सुप्‍त लाट

1998 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने काँग्रेसला साथ दिली होती. 48 पैकी 33 काँग्रेस, सहा शिवसेना, भाजप चार व अन्य पाच अशी पक्षीय स्थिती होती. काँग्रेस आणि रिपाइं गटाने एकत्रित निवडणुका लढविल्याने त्याचा फायदा काँग्रेसला मोठ्या प्रमाणात झाला. भाजप, सेनेचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. वाजपेयींचे तेरा दिवस, देवेगौडा, गुजराल असे तीन पंतप्रधान देशाने अनुभवले होते. … The post वेध लोकसभेचे : १९९८ काँग्रेसची सुप्‍त लाट appeared first on पुढारी.

वेध लोकसभेचे : १९९८ काँग्रेसची सुप्‍त लाट

उमेश काळे

1998 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने काँग्रेसला साथ दिली होती. 48 पैकी 33 काँग्रेस, सहा शिवसेना, भाजप चार व अन्य पाच अशी पक्षीय स्थिती होती. काँग्रेस आणि रिपाइं गटाने एकत्रित निवडणुका लढविल्याने त्याचा फायदा काँग्रेसला मोठ्या प्रमाणात झाला. भाजप, सेनेचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. वाजपेयींचे तेरा दिवस, देवेगौडा, गुजराल असे तीन पंतप्रधान देशाने अनुभवले होते. राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात काँग्रेसच्या पारड्यात मतदारांनी कौल दिला. परंतु देशपातळीवरील चित्र मात्र अस्थिरतेच राहिले. भाजप हा सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरल्याने अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाले. त्यांचे  सरकार तेरा महिन्यानंतर एका मतांनी पडले.
मराठवाड्याचा विचार करता धक्‍कादायक निकाल लागला तो संभाजीनगरचा. कारण संभाजीनगर हा एव्हाना शिवसेनेचा बालेकिल्‍ला झाला होता. प्रदीप जैस्वाल यांनी सेनेने पुन्हा उमेदवारी दिली होती. त्यांना सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते आणि काँग्रेस नेते रामकृष्णबाबा पाटील यांनी 30 हजार 126 मतांनी पराभूत केले. हिंगोलीत काँग्रेस नेत्या सूर्यकांता पाटील यांनी शिवसेनेचे अ‍ॅड. शिवाजी माने यांचा 77,666  मतांनी पराभव केला. लातुरात शिवराज पाटील यांनी भाजपचे डॉ. गोपाळराव पाटील यांचा तीन हजार मतांनी पराभव केला. नांदेडात भास्करराव खतगावकर यांना भाजपचे डॉ. धनाजीराव देशमुख यांना 47 हजार मतांनी पराभूत केले.परभणीत काँग्रेस उमेदवार सुरेश वरपूडकर यांनी शिवसेनेचे सुरेश जाधव यांचा 45,493 मतांनी तर धाराशिवला अरविंद कांबळे यांनी शिवसेनेचे शिवाजी कांबळे यांचा 47 हजार मतांनी पराभव केला.
जयसिंगराव गायकवाडांचा विजय
या निवडणुकीत भाजपने दोन विजय मिळविले. बीडमधून जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी काँग्रेस नेते अशोक पाटील यांचा सहा हजार मतांनी तर जालन्यातून उत्तमसिंह पवार हे अवघ्या 1800 मतांनी विजयी झाले. गायकवाड यांनी पदवीधर मतदारसंघातून यापूर्वी दोन वेळा भाजपचे प्रतिनिधीत्व केेले होते. राज्यातून दिल्‍लीत जाण्याची त्यांची इच्छा नव्हती. पण रजनी पाटील यांनी भाजप सोडल्यामुळे भाजपसमोरही दुसरा पर्याय नव्हता. संघ, अभाविप व पुढे भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते अशी त्यांची ओळख. पायात भिंगरी बांधून त्यांनी मराठवाडाभर भाजप विचारसरणी रूजविली होती. खेड्यापाड्यातील सामान्य कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणारा नेता अशी त्यांची प्रतिमा. 1999 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे राधाकृष्ण पाटील यांचा 51,190 मतांनी पराभव केला.त्यानंतरची निवडणूक ते राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लढले. त्यात त्यांनी भाजपचे प्रकाश सोेळंके यांना 47 हजार मतांनी पराभूत केले. आपल्या कारकिर्दीत सभागृहे बांधाणारा खासदार ही त्यांची ओळख न पुसणारीच आहे. खासदार निधीचा उपयोग त्यांनी सामाजिक सभागृहे बांधण्यासाठी केला.  15 हजार किलोमीटर पदयात्रा, सहा लाख झाडे लावणे, प्रवासात 24 तांडे व 642 खेड्यांत मुक्काम या आगळ्यावेगळ्या नोंदी त्यांच्या नावावर आहेत. वाजपेयी सरकारच्या काळात त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्रीपद होते. भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी असा प्रवास त्यांचा राहिला आहे. गायकवाड हे राष्ट्रवादीत असले तरी अजूनही जनमााणसांत असणारी भाजप नेता ही ओळख पुसली असेल असे काही वाटत नाही, एवढे काम त्यांनी जनसंघ, भाजपसाठी केले आहे.

दोन वेळा खासदार
उत्तमसिंह पवार यांना जालन्यातून दोन वेळा संधी मिळाली. पवार हे तसे जनता दलाचे कार्यकर्ते. 1990 मध्ये ते सिल्‍लोड विधानसभा  जनता दलाकडून लढले. त्यात त्यांना यश आले नाही.  उद्योगपती असल्याने पुढे त्यांचे भाजप नेत्यांशी संबंध जुळले आणि त्यांना 1997 ला जालन्यातून उमेदवारी मिळाली. त्यावेळी पुंडलिक हरी दानवे यांना नाकारून पवार यांना उमेदवारी दिल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांनी केलेले बंड शम विण्यासाठी गोपीनाथरावांना जालन्यात यावे लागले.99 ला त्यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांशी मतभेद झाल्याने त्यांना भाजपमधून बाहेर पडावे लागले.

हेही वाचा 

बिहारमधील राजकारणावर प्रशांत किशोर यांचे मोठे भाकीत; ‘भाजपसह मित्र पक्ष आगामी काळात…’
Lok Sabha Election 2024 : मतदान करताना भारतीय महिला नवऱ्याचा ‘आदेश’ मानतात का? निवडणुकांचा अभ्यास काय सांगतो?
Lok Sabha Election 2024 | उत्तरेतील दिग्गजांना शह देत दाक्षिणात्य पी. व्ही. नरसिंह राव कसे बनले होते पंतप्रधान?
Lok Sabha Election 2024 : वेध लोकसभेचे; लोकसभा निवडणुकांत अनुभवले चढउतार   
Lok Sabha Election 2024 | वेध लोकसभेचे; निझामाविरोधात लढणार्‍या स्वातंत्र्यसेनानींना संधी 

Latest Marathi News वेध लोकसभेचे : १९९८ काँग्रेसची सुप्‍त लाट Brought to You By : Bharat Live News Media.