भाजपने चंदीगडमधून किरण खेर यांचे तिकीट कापले
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दहावी यादी आज (दि.१०) जाहीर केली आहे. चंदीगडमधून अभिनेत्री किरण खेरचे तिकीट कापून त्यांच्या जागी संजय टंडन यांना उमेदवारी दिली आहे. टंडन हे चंदीगड भाजपचे अध्यक्ष आहेत. या यादीत 8 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. भाजपने या यादीत यूपी आणि बंगालमधील उमेदवारांची घोषणा केली आहे. BJP Candidates List
भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेशने मैनपुरीमधून जयवीर सिंह ठाकूर, कौशांबीमधून विनोद सोनकर, फुलपूरमधून प्रवीण पटेल, अलाहाबादमधून नीरज त्रिपाठी, बलियामधून नीरज शेखर, मच्छलीशहरमधून बीपी सरोज आणि गाझीपूरमधून पारस नाथ राय यांना तिकीट दिले आहे. याशिवाय भाजपने चंदीगडमधून संजय टंडन आणि बंगालच्या आसनसोलमधून एसएस अहलुवालिया यांना उमेदवारी दिली आहे. BJP Candidates List
BJP Candidates List : भाजप उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे –
चंदीगड
चंदीगड- संजय टंडन
उत्तर प्रदेश
बलिया- नीरज शेखर
मछलीशहर – बी.पी. सरोज
गाजीपूर – पारस नाथ राय
मैनपुरी – जयवीर सिंह ठाकूर
कौशाम्बी – विनोद सोनकर
फुलपूर- प्रवीण पटेल
इलाबाद- नीरज त्रिपाठी
पश्चिम बंगाल
आसनसोल – एस. एस. अबलुवालिया
BJP releases its 10th list of candidates for the Lok Sabha elections.#LokSabaElection2024 pic.twitter.com/gyPPEm7Z40
— ANI (@ANI) April 10, 2024
Lok Sabha Election 2024: देशाच्या पूर्व किनारपट्टीवर भाजपचे वादळ घोंघावणार
Lok Sabha Election 2024 : हरियाणात जाट मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर
Maharashtra Politics : अलविदा मनसे! भाजपला पाठिंबा देताच राज ठाकरेंना धक्का; किर्तीकुमार शिंदेंचा राजीनामा
The post भाजपने चंदीगडमधून किरण खेर यांचे तिकीट कापले appeared first on Bharat Live News Media.