लातूर: उदगीर-निलंगा मार्गावर कार, ट्रकचा भीषण अपघात; ४ ठार
देवणी, Bharat Live News Media वृत्तसेवा : उदगीर – निलंगा राज्य मार्गावर असलेल्या धनेगावजवळ आज (दि.१०) दुपारी झालेल्या ट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. अपघातातील मृत मध्यप्रदेशातील इंदौर येथील कापडाचे व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. Latur Accident News
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी कार (एमपी ०९ डीई ५२२७) वलांडीहून निलंग्याकडे जात होती. यावेळी समोरून येणारा ट्रक (एम एच २५ जे ७३६५) आणि कारची जोराची धडक झाली. या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यु झाला. Latur Accident News
अपघात इतका भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला आहे. जेसीबीच्या सहाय्याने कार बाजूला काढण्यात आली. यावेळी देवणी पोलीस ठाण्याचे सपोनि माणिकराव डोके व सहकारी यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मृतांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
हेही वाचा
Lok Sabha Election 2024 : नांदेड, हिंगोली, लातूरमध्ये थेट लढती
लातूर: औराद परिसरात भूगर्भातील गूढ आवाजाने नागरिक भयभीत
लातूर : भरधाव कार हॉटेलात घुसली; भीषण अपघातात २ जण ठार; ३ जखमी
Latest Marathi News लातूर: उदगीर-निलंगा मार्गावर कार, ट्रकचा भीषण अपघात; ४ ठार Brought to You By : Bharat Live News Media.