वेताळेच्या सिद्धेश्वर महाराजांची यात्रा उत्साहात : शर्यतीत 175 बैलगाडे धावले
कडूस : Bharat Live News Media वृत्तसेवा : वेताळे (ता. खेड) येथील सिध्देश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त ग्रामस्थांनी सकाळी गावातून देवदेवतांसह हारतुर्यांची मिरवणूक काढली. रात्री वेल्हावळे येथील गुरुदत्त कला मंडळ आणि होनोबा भजनी मंडळाचा भारुडाचा कार्यक्रम झाला. सोमवारी (दि. 8) भारुडाचा हजेरीचा कार्यक्रम झाला. रात्री ऑर्केस्ट्रा झाला. तर मंगळवारी (दि. 9) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी पंचाग वाचन झाले, दुपारी 4 वाजता कुस्त्यांचा आखाडा पार पडला.
दरम्यान बैलगाडा शर्यतीत 175 बैलगाड्यांनी सहभाग घेतला. फायनल शर्यतीमध्ये नीलेश घनवट आरबुज यांच्या जुगलबंदीच्या बैलगाड्याने प्रथम क्रमांक पटकाविला. दुसरा क्रमांक वाघेश्वर बैलगाडा संघटना, वारिंगे, सांडभोर जुगलबंदीच्या गाड्याने पटकवला. तिसरा सुभाष राजाराम बोंबले, चौथा गणेश राजाराम वाळुंज आणि महेंद्र शिंदे, पाचवा कान्हेवाडी येथील सरपंच बबन धोंडिबा, सहावा दिवंगत शंकर महादेव बोंबले, पांडुरंग कोंडिबा जाधव, सुभाष चासकर यांच्या जुगलबंदीच्या गाड्याने पटकावला, तर घाटाचा राजा हा सन्मान सुभाष राजाराम बोंबले यांच्या बैलगाड्याने मिळवला.
शर्यतीत 12 सेकंदात स्वरूप सांडभोर वाघेश्वर बैलगाडा संघटनेने फळीफोड करीत पहिला क्रमांक पटकावला. 13 सेकंदांत माजी सरपंच सचिन सूर्यकांत भंडलकर यांच्या बैलगाड्याने दुसर्या क्रमाकांने फळीफोड केली. 14 सेकंदाची तिसर्या क्रमांकात कडूस येथील लाडक्या बैलगाडा संघटनेचे बाजीराव बोर्हाडे यांनी मान मिळवला, तर चौथ्यामध्ये वाशेरे येथील बबनराव विष्णू कावडे यांनी फळीफोड करीत बाजी मारली. आकर्षक बारीचे मानकरी रवींद्र मंजाबा बारणे हे ठरले.
हेही वाचा
अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकले नाही, आढळरावांनी मात्र जनतेला जपले : अतुल बेनके
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोट नगरी फुलली; दंडवत घालून हजारो भक्तांचा संकल्प
Lok Sabha Election 2024: देशाच्या पूर्व किनारपट्टीवर भाजपचे वादळ घोंघावणार
Latest Marathi News वेताळेच्या सिद्धेश्वर महाराजांची यात्रा उत्साहात : शर्यतीत 175 बैलगाडे धावले Brought to You By : Bharat Live News Media.