श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोट नगरी फुलली; दंडवत घालून हजारो भक्तांचा संकल्प

 पुढारी वृत्तसेवा : श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त आज (दि.१०) अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय… घोषात हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ मंदिर ते समाधी मठापर्यंत दंडवत घालून संकल्प केला. आज श्री स्वामी समर्थ प्रकट दिन असल्याने सालाबादप्रमाणे यंदाही अक्कलकोट शहरासह राज्यातील विविध जिल्ह्यातून हजारो स्वामी भक्त आले … The post श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोट नगरी फुलली; दंडवत घालून हजारो भक्तांचा संकल्प appeared first on पुढारी.

श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोट नगरी फुलली; दंडवत घालून हजारो भक्तांचा संकल्प

 Bharat Live News Media वृत्तसेवा : श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त आज (दि.१०) अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय… घोषात हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ मंदिर ते समाधी मठापर्यंत दंडवत घालून संकल्प केला.
आज श्री स्वामी समर्थ प्रकट दिन असल्याने सालाबादप्रमाणे यंदाही अक्कलकोट शहरासह राज्यातील विविध जिल्ह्यातून हजारो स्वामी भक्त आले होते. श्री स्वामी समर्थ मंदिर ते श्री स्वामी समर्थ समाधी मठापर्यंत दंडवत घालून संकल्प करण्यासाठी अक्कलकोट नगरी मंगळवारी रात्रीपासूनच स्वामी भक्तांनी फुलली होती. मध्यरात्री एक वाजता स्वामी भक्तांनी स्वामी समर्थ मंदिरातून दंडवत घालण्यास प्रारंभ केला. शहरातील फत्तेसिंह चौक, समर्थ चौक, वीर सावरकर चौक, मेन रोड, कारंजा चौक मार्गे स्वामी समर्थ समाधी मठ येथे समारोप केला. त्यानंतर श्री स्वामी समर्थ समाधी मठात हजारो भक्तांनी स्वामीनामाचा जप केला. समाधी मठ येथे पत्त्तरगी परिवाराकडून तर श्री वटवृक्ष मंदिराजवळ हिंडोळे परिवाराकडून भक्तांना चहाचे वाटप करण्यात आले.
नगरपालिकेकडून स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट नगरपालिकेकडून शहरातील मुख्य रस्त्यावर अंधार व अस्वच्छतेमुळे स्वामी भक्तांना त्याचा नाहक त्रास झाला. याचबरोबर रस्त्यावरील कुठल्याही प्रकारची झाडलोट न करता सर्वत्र घाणीचे साम्राज्य होते. गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने त्यातूनच वाट काढत स्वामी भक्तांना दंडवत घालावे लागले. नगरपालिका प्रशासनाने याची दखल घेऊन शहरातील गटारीची स्वच्छता करावी, लाईटची व्यवस्था करावी, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.
Latest Marathi News श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोट नगरी फुलली; दंडवत घालून हजारो भक्तांचा संकल्प Brought to You By : Bharat Live News Media.