कसरत पाणी पिण्याची!
नैरोबी : निसर्गाने काही देणग्या दिलेल्या असतात, तर काही समस्याही दिलेल्या असतात. जिराफाची ताडमाड उंची, लांबलचक मान यामुळे त्याला उंच झाडांची पाने खाणे तसेच शिकार्यांपासून स्वतःचा बचाव करणे या गोष्टी साध्य करणे सोपे होते. मात्र, पाणी पीत असताना या प्राण्याला कसरतच करावी लागते. खाली मान घेऊन पाणी पिण्यासाठी त्याला आपले पाय पसरावे लागतात आणि उंचच्या उंच मान वाकवावी लागते!
याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यामध्ये या प्राण्यासाठी पाणी पिण्याचे साधे वाटणारे कामही किती आव्हानात्मक असते हे दर्शवले आहे. व्हिडीओत दिसते की, हा जिराफ एका नदीच्या काठावर उभा आहे. त्याला पाणी प्यायचे आहे; पण ते सहजपणे पिता येत नाही. नंतर तो पाय आणि मानेचे संतुलन साधत पाणी पिऊन आपली तहान भागवतो. ‘एक्स’वर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे व त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. जंगलातील जीवन खडतरच असते; पण पाणी पिणेही किती आव्हानात्मक ठरू शकते, हे यावरून दिसून येते.
Latest Marathi News कसरत पाणी पिण्याची! Brought to You By : Bharat Live News Media.