गोंदियात वादळी अवकाळीचा तडाखा; विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट असून जिल्ह्यातील काही भागात पावसाची नोंद करण्यात आली. त्यात मंगळवारी (ता. ९) रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास संपूर्ण जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गहू व मका पिकासह भाजीपाला, आंबा पिकाला फटका बसला आहे. ( Gondia Rain ) संबंधित बातम्या  अंतराळातून … The post गोंदियात वादळी अवकाळीचा तडाखा; विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी appeared first on पुढारी.

गोंदियात वादळी अवकाळीचा तडाखा; विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

गोंदिया, Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट असून जिल्ह्यातील काही भागात पावसाची नोंद करण्यात आली. त्यात मंगळवारी (ता. ९) रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास संपूर्ण जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गहू व मका पिकासह भाजीपाला, आंबा पिकाला फटका बसला आहे. ( Gondia Rain )
संबंधित बातम्या 

अंतराळातून पृथ्वीवर कृष्णविवरासारखी दिसली सूर्यग्रहणाची काळी छाया
नाशिककरांनी उभारली चैतन्य अन् मांगल्याची गुढी
Narayangaon : तमाशापंढरीत चार ते पाच कोटींची उलाढाल..!

हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. दिवसभर कडक ऊन तापल्यानंतर सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल होऊन वादळाला सुरुवात होत आहे. काही भागात पावसाच्या सरी तर काही भागात तुरळक पावसाची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, मंगळवारी, दिवसभर ऊन सावल्यांचा खेळ सुरू असताना रात्रीच्या सुमारास गोंदिया शहरासह जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सडक अर्जुनी, तिरोडा तालुक्यात सर्वत्र विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. विशेषतः या पावसामुळे जिल्ह्यातील गहू व मका पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आली. ढगाळ वातावरणाने भाजीपाला पिकावर किडींचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महत्वाचे म्हणजे, सद्या आंबा फळ पाळावर येत असून वादळी पावसामुळे आंबा फळालाही फटका बसला आहे.
उष्णतेपासून दिलासा…
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांसह भाजीपाला उत्पादकांना नुकसान सहन करावे लागले असले तरी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे जिल्हावासियांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
यांचे वाढले टेंशन….
अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला मात्र, दुसरीकडे वादळ व पावसामुळे लग्न समारंभ असलेल्या वधू-वर मंडळी व निवडणूकीच्या धामधुमीत असलेल्या उमेदवारांसह पक्षाचे पदाधिकाऱ्यांचे टेंशन वाढले आहे. ( Gondia Rain )
Latest Marathi News गोंदियात वादळी अवकाळीचा तडाखा; विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी Brought to You By : Bharat Live News Media.