नाना पटोलेंच्या गाडीला अपघात; घातपाताचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झाला. भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला ट्रकने धडक दिली. दरम्यान, पटोलेंचा घातपात करण्याचा डाव होता, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
अतुल लोंढेंचे एक्सपोस्टवरून आरोप
अतुल लोंढे यांनी एक्स पोस्टवरून घातपाताचा आरोप केला आहे. नाना पटोले यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला. त्यांचा घातपात करण्याचा डाव होता. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल लोंढे यांनी केला आहे.
विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का ?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा…
— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) April 10, 2024
Latest Marathi News नाना पटोलेंच्या गाडीला अपघात; घातपाताचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप Brought to You By : Bharat Live News Media.