पत्नीवर खोटे आरोप लावणाऱ्या पतीला चाबकाच्या फटक्यांची शिक्षा

कराची : पत्नीला झालेले मूल आपले नाहीच व तिचे बाहेर संबंध आहेत, असे खोटे आरोप करणाऱ्या पतीला चाबकाचे ८० फटके देण्याचा आदेश सिंध प्रांतातील न्यायालयाने दिला आहे. द डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, आरोपी फरीद याने पत्नीविरोधात केलेले सारे आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाल्यावर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश शहनाज बोहियो यांनी … The post पत्नीवर खोटे आरोप लावणाऱ्या पतीला चाबकाच्या फटक्यांची शिक्षा appeared first on पुढारी.

पत्नीवर खोटे आरोप लावणाऱ्या पतीला चाबकाच्या फटक्यांची शिक्षा

कराची : पत्नीला झालेले मूल आपले नाहीच व तिचे बाहेर संबंध आहेत, असे खोटे आरोप करणाऱ्या पतीला चाबकाचे ८० फटके देण्याचा आदेश सिंध प्रांतातील न्यायालयाने दिला आहे.
द डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, आरोपी फरीद याने पत्नीविरोधात केलेले सारे आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाल्यावर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश शहनाज बोहियो यांनी ही शिक्षा ठोठावली. १९७९ च्या कज्फ कायद्यात खोटा दावा करण्याबाबत ८० फटक्यांची शिक्षा देण्याची तरतूद आहे. या शिक्षेला शरियत कोर्टाची मान्यता मिळाल्यावर आरोपीला वरच्या न्यायालयात या शिक्षेला आव्हान देता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. फरीदने लग्न झाल्यानंतर वर्षभरात झालेली मुलगी आपली नसल्याचे सांगत पत्नीला तलाक दिला होता. त्याविरोधात तिने न्यायालयात दाद मागितली होती.
Latest Marathi News पत्नीवर खोटे आरोप लावणाऱ्या पतीला चाबकाच्या फटक्यांची शिक्षा Brought to You By : Bharat Live News Media.