कागलमध्ये महायुतीला मताधिक्य मिळणार का?

कागल : जिल्ह्याच्या राजकारणावर गेल्या अनेक वर्षांपासून हुकूमत गाजवत असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत संजय मंडलिक यांना 71 हजारांहून अधिक मताधिक्य मिळालेले होते. यामध्ये वाढ होणार की मताधिक्य कमी होणार, याची चर्चा सध्या सुरू आहे. या निवडणुकीत संजय मंडलिक यांच्या पाठीशी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील नेते समरजितसिंह घाटगे आहेत. … The post कागलमध्ये महायुतीला मताधिक्य मिळणार का? appeared first on पुढारी.

कागलमध्ये महायुतीला मताधिक्य मिळणार का?

बा. ल. वंदूरकर

कागल : जिल्ह्याच्या राजकारणावर गेल्या अनेक वर्षांपासून हुकूमत गाजवत असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत संजय मंडलिक यांना 71 हजारांहून अधिक मताधिक्य मिळालेले होते. यामध्ये वाढ होणार की मताधिक्य कमी होणार, याची चर्चा सध्या सुरू आहे. या निवडणुकीत संजय मंडलिक यांच्या पाठीशी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील नेते समरजितसिंह घाटगे आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचा या निवडणुकीमध्ये कस लागणार आहे.
गेल्या निवडणुकीमध्ये संजय मंडलिक विरुद्ध धनंजय महाडिक अशी लढत झाली होती. त्यावेळी या मतदारसंघामध्ये संजय मंडलिक यांनी शिवसेनेमार्फत निवडणूक लढवलेली होती. त्यावेळी ना. हसन मुश्रीफ यांचा धनंजय महाडिक यांना पाठिंबा होता. संजय मंडलिक यांना गेल्या निवडणुकीत या मतदारसंघामध्ये चांगले मताधिक्य मिळालेले होते. शिवसेना फुटल्यानंतर संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.
तालुक्यातील सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, स्वतः संजय मंडलिक यांचा गट आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील नेते समरजितसिंह घाटगे हे खासदार मंडलिक यांच्यासोबत, तर माजी आमदार संजय घाटगे गट तसेच गडहिंग्लज तालुक्यातील गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी व उमेश आपटे हे प्रमुख शाहू महाराजांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
आमदार सतेज पाटील यांनी या मतदारसंघामध्ये काँग्रेस मजबूत करण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत. त्यांनी स्वाती कोरी आणि उमेश आपटे यांना बळ दिले आहे. सध्या तिन्ही राजकीय गट एकत्र असल्याने संजय मंडलिक यांना मताधिक्य मिळणार का, याबाबतची उत्सुकता लागून राहिली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची पेरणी केली जात आहे. त्याद़ृष्टीने प्रत्येक जण वेगवेगळे फासे टाकण्याच्या प्रयत्न करत आहेत. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोण कुणावर कशी टीका करतो आणि कुणाचा किती दुरावा राहतो, एका व्यासपीठावर येऊन समन्वयाचे वातावरण निर्माण होणार काय, याबाबतदेखील चर्चा सुरू आहेत. गटांतर्गत कार्यकर्त्यांचा सूर ओळखून नियोजन करावे लागणार आहे.
गेल्या निवडणुकीत होते एकतर्फी मताधिक्य
गेल्या निवडणुकीमध्ये कागल विधानसभा मतदारसंघातून खा. संजय मंडलिक यांना 1 लाख 48 हजार 727, तर धनंजय महाडिक यांना अवघी 77,300 मते मिळालेली होती. बहुजन वंचित आघाडीच्या अरुणा माळी यांना 9833 मते मिळाली होती. मंडलिक यांना 71,427 इतके मताधिक्य मिळालेले होते. या दोन्ही मतांमधील फरक पाहता संजय मंडलिक यांना एकतर्फी मताधिक्य मिळालेले होते. गेल्या निवडणुकीमध्ये ना. हसन मुश्रीफ हे मंडलिक यांच्या विरोधी गटात होते. या निवडणुकीमध्ये काय होणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
Latest Marathi News कागलमध्ये महायुतीला मताधिक्य मिळणार का? Brought to You By : Bharat Live News Media.