शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, साताऱ्यातून शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीवर शिक्कोमोर्तब

पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्रजी पवार पक्षाने लोकसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांची तिसरी यादी बुधवारी (दि.१०) जाहीर केली. पक्षाने साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Lok Sabha Elections 2024 NCP- Sharadchandra Pawar) तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अमर … The post शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, साताऱ्यातून शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीवर शिक्कोमोर्तब appeared first on पुढारी.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, साताऱ्यातून शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीवर शिक्कोमोर्तब

Bharat Live News Media ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्रजी पवार पक्षाने लोकसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांची तिसरी यादी बुधवारी (दि.१०) जाहीर केली. पक्षाने साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Lok Sabha Elections 2024 NCP- Sharadchandra Pawar) तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
अमर काळे- वर्धा
भास्कर भगरे- दिंडोरी
सुप्रिया सुळे- बारामती
डॉ. अमोल कोल्हे- शिरुर
निलेश लंके- अहमदनगर
बजरंग सोनवणे- बीड
सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे- भिवंडी
शशिकांत शिंदे- सातारा
श्रीराम पाटील- रावेर
तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली असल्याचे पक्षाने X वर पोस्ट करत म्हटले आहे.
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांमध्ये सुरू असलेल्या वादावर मंगळवारी पडदा पडला होता. जागावाटपाच्या सूत्रात शिवसेना मोठा भाऊ ठरला. ठाकरे गट २१ जागांवर तर काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १० जागांवर लढणार आहे. सांगलीची जागा ठाकरे गटच लढविणार असून भिवंडी राष्ट्रवादी (शरद पवार) लढणार आहे. राष्ट्रवादीने (शरद पवार) भिवंडीतून सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात शशिकांत शिंदे
विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृती कारणास्तव निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे साताऱ्यात उदयनराजे यांच्याविरोधात शशिकांत शिंदे असा सामना होणार आहे.

Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar party has announced the third list of candidates for the Lok Sabha Elections 2024.#Maharashtra pic.twitter.com/AUSZWrgA0Q
— ANI (@ANI) April 10, 2024

Latest Marathi News शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, साताऱ्यातून शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीवर शिक्कोमोर्तब Brought to You By : Bharat Live News Media.