पुणे : रुग्ण हक्क कल्याण समितींचा बट्ट्याबोळ !
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील नागरिकांना आरोग्यविषयक सेवासुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्ण कल्याण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मंजूर 54 ठिकाणांपैकी केवळ 23 ठिकाणी समिती स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत शहरातील महापालिका व नगरपालिकांच्या दवाखान्यांमध्ये रुग्ण कल्याण समिती स्थापन करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने 2015 साली मंजूर केला. शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या 19 प्रसूतिगृहांमध्ये आणि 35 दवाखान्यांमध्ये सातसदस्यीय रुग्ण कल्याण समिती स्थापन होणे अपेक्षित होते.
कोरोना काळात समिती अस्तित्वात येऊ शकली नाही. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्ण कल्याण समिती स्थापन करण्यास सुरुवात झाली. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. आत्तापर्यंत केवळ 23 ठिकाणी समिती स्थापन झाली आहे. समिती स्थापन झाल्यानंतर शासनाकडून प्रसूतिगृहांना दरवर्षी अडीच लाख रुपये आणि दवाखान्यांना 1 लाख 75 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
निधीचा वापर कशासाठी?
गरीब रुग्णांसाठी औषध खरेदी, बाहेरील प्रयोगशाळेतील नमुने तपासणी खर्च, रुग्णालयांसाठी रुग्णालयीन कपडे, बाळ व बाळंतिणीस नवीन कपडे, इमारत व निवासस्थानांची किरकोळ दुरुस्ती, रुग्णांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करणे, रुग्णांसाठी बैठकव्यवस्था करणे, रुग्णांसाठी गरम पाण्याची व्यवस्था करणे, स्वयंपाकघर व धर्मशाळेची कुरकोळ दुरुस्ती करणे, रुग्णांसाठी शौचालयाची व्यवस्था करणे, नावीन्यपूर्ण योजनांवर खर्च करणे.
हेही वाचा
पुणे बनतय अपहरणाच शहर : सव्वातीन वर्षांत 1 हजार 866 जणांचे अपहरण
उमेदवाराने प्रत्येक संपत्तीचा उल्लेख करणे गरजेचे नाही : सर्वोच्च न्यायालय
आरटीई प्रवेश प्रकरण थेट न्यायालयात; ‘आप’ पालक युनियन करणार याचिका दाखल
Latest Marathi News पुणे : रुग्ण हक्क कल्याण समितींचा बट्ट्याबोळ ! Brought to You By : Bharat Live News Media.