जागतिक होमिओपॅथी दिन : होमिओपॅथीला हवाय सरकारी राजाश्रय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अ‍ॅलोपॅथीला जसे सरकारी पाठबळ आहे तसेच पाठबळ होमिओपॅथीला सरकारने देणे आवश्यक होते. परंतु, होमिओपॅथीच्या बाबतीत मोठा दुजाभाव केला जात आहे. त्यामुळे सरकारने महाविद्यालये तसेच संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देऊन होमिओपॅथीला सरकारी राजाश्रय देणे काळाची गरज असल्याचे मत होमिओपॅथी तज्ज्ञांनी व्यक्त केले. ‘संशोधन सक्षम करणे, प्रवीणता वाढवणे’ होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल … The post जागतिक होमिओपॅथी दिन : होमिओपॅथीला हवाय सरकारी राजाश्रय appeared first on पुढारी.

जागतिक होमिओपॅथी दिन : होमिओपॅथीला हवाय सरकारी राजाश्रय

गणेश खळदकर

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : अ‍ॅलोपॅथीला जसे सरकारी पाठबळ आहे तसेच पाठबळ होमिओपॅथीला सरकारने देणे आवश्यक होते. परंतु, होमिओपॅथीच्या बाबतीत मोठा दुजाभाव केला जात आहे. त्यामुळे सरकारने महाविद्यालये तसेच संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देऊन होमिओपॅथीला सरकारी राजाश्रय देणे काळाची गरज असल्याचे मत होमिओपॅथी तज्ज्ञांनी व्यक्त केले.

‘संशोधन सक्षम करणे, प्रवीणता वाढवणे’
होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 10 एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला जातो.  या वर्षीच्या जागतिक होमिओपॅथी दिनाची थीम ‘संशोधन सक्षम करणे, प्रवीणता वाढवणे’ अशी आहे.

होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार चांगल्या पद्धतीने होत आहे, परंतु सरकारी दवाखान्यांमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना कोणत्याही प्रकारच्या संधी असल्याचे दिसत नाही. बीएचएमएस डॉक्टरांऐवजी बीएएमएस किंवा एमबीबीएस डॉक्टरांनाच मोठ्या प्रमाणात संधी दिली जाते. त्यामुळे होमिओपॅथीच्या डॉक्टरांनादेखील सरकारी रुग्णालयात सामावून घेतले तर रुग्णांच्या गरजेनुसार उपचार करता येणे शक्य होईल.

– डॉ. योगिता पवार, होमिओपॅथीतज्ज्ञ 

अ‍ॅलोपॅथीमध्ये जे संशोधन होते तशाच प्रकारचे संशोधन होमिओपॅथीमध्ये होण्यास मोठ्या प्रमाणात मर्यादा आहेत. त्यामुळे होमिओपॅथीमध्ये संशोधन करण्यासाठी एक नवीन आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यासाठीची व्यवस्था सरकारने तयार करणे गरजेचे आहे. नॅशनल कौन्सिल होमिओपॅथी अर्थात एनसीएच ही संस्था सध्या खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. या संस्थेने अभ्यासक्रमात देखील चांगले बदल केले आहेत. होमिओपॅथीला आलेल्या विद्यार्थ्यांना देखील चांगल्या पध्दतीने प्रशिक्षित करणे गरजेचे आहे.

– डॉ. जतन राजोरे, होमिओपॅथीतज्ज्ञ 

हेही वाचा

रत्नागिरी : यंदाच्या हंगामात 28 टन ‘हापूस’ची अमेरिकेला निर्यात
जागतिक होमिओपॅथी दिन : कोरोनानंतर होमिओपॅथीकडे रुग्णांचा वाढता कल
महिला मतांसाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न

Latest Marathi News जागतिक होमिओपॅथी दिन : होमिओपॅथीला हवाय सरकारी राजाश्रय Brought to You By : Bharat Live News Media.