सांगली : मदनभाऊंप्रमाणे विशाल बंद दरवाजा फोडणार का? समाजमाध्यमातून विचारणा

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी सध्या काँग्रेसला करावी लागणारी याचना पाहता, काँग्रेस नेते मदन पाटील यांच्या खमकेपणाची आठवण ताजी झाली. ज्याने, त्याने मगदुराप्रमाणे मदनभाऊंच्या धडाडीला समाजमाध्यमात सलाम केला. मागून मिळत नसेल तर लढून मिळवा, पण मिळवाच, हा संदेश समाजमाध्यमातून काँग्रेसला, विशाल पाटील यांना दिला. साल 2004. खासदार प्रकाशबापू पाटील यांना लोकसभेची उमेदवारी … The post सांगली : मदनभाऊंप्रमाणे विशाल बंद दरवाजा फोडणार का? समाजमाध्यमातून विचारणा appeared first on पुढारी.

सांगली : मदनभाऊंप्रमाणे विशाल बंद दरवाजा फोडणार का? समाजमाध्यमातून विचारणा

सांगली; Bharat Live News Media वृत्तसेवा : सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी सध्या काँग्रेसला करावी लागणारी याचना पाहता, काँग्रेस नेते मदन पाटील यांच्या खमकेपणाची आठवण ताजी झाली. ज्याने, त्याने मगदुराप्रमाणे मदनभाऊंच्या धडाडीला समाजमाध्यमात सलाम केला. मागून मिळत नसेल तर लढून मिळवा, पण मिळवाच, हा संदेश समाजमाध्यमातून काँग्रेसला, विशाल पाटील यांना दिला.
साल 2004. खासदार प्रकाशबापू पाटील यांना लोकसभेची उमेदवारी नाकारण्याचा घाट घातला होता. त्यांच्या प्रकृतीचे कारण दिले होते. उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत सुरूच होता. नेते मोहनराव कदम यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यांनी काँग्रेस कार्यालयासमोर मांडवही घातलेला. झाले, मदनरावांनी दिल्लीश्वरांना बजावले. प्रकाशबापूंना निवडून आणण्याचा ‘शब्द’ दिला. उमेदवारी मिळवली, ‘शब्द’ सार्थ करून दाखवला. राजकारणात सतत नेमस्त राहून चालत नाही. विरोधक कोणती चाल खेळतोय त्याचा विचार करत कधी, कधी आक्रमकही व्हावे लागते, तर कधी गुळातून विषबाधेचाही प्रयोग करून राजकीय पराभव करता येतो. काळानुरूप चाल खेळताच आली पाहिजे, असा समाजमाध्यमातील ‘पुढे चाल’ दिलेल्या संदेशांचा सूर आहे. काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्याशी केलेला हा ऑनलाईन संवाद आहे.
मदनभाऊंची आणखी एक जबरदस्त आठवण जोजवली गेली. साल होते 2004. मदन पाटील यांना मंत्रीपद द्यावे यासाठी ते कार्यकर्त्यांसह नेते शरद पवार यांना भेटले. तुमच्या मंत्रिपदाची दारे जनतेनेच बंद केलेली आहेत, मंत्री व्हायला जनतेतून निवडून यायला लागते, असे त्यांनी त्यांना सुनावले. मदनभाऊ भडकले आणि बंद दरवाजा फोडून येईन, असे सांगत बैठकीतून निघून गेले.
2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मदन पाटील यांना उमेदवारी नाकारलेली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय फोडलेले. त्यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आणि ‘मै हूँ ना’ची टॅगलाईन जाहीर केली. पवार यांची टिपणी कार्यकर्त्यांना झोंबलेली. कालौघात कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली आणि मदनभाऊंनी दोनवेळा लोकसभा आणि एकवेळा विधानसभा गाजवली. ते मंत्रीही झाले, तो भाग अलाहिदा. घटनेचे तात्पर्य काय, तर वेळेवर निर्णय घेण्याची धमक, खमकेपणा, परिणामांना सामोरे जाण्याची तयारी. आज विशाल पाटील यांच्यावर पर्यायाने सांगली काँग्रेसवर वेळ आलीय खमकेपणा दाखविण्याची, वेळेवर निर्णय घेण्याची, धमक दाखविण्याची. त्यांनी आक्रमकपणे रिंगणात येऊन लढावे, अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमात आणि रस्त्यावर उमटत आहेत. आज मदन पाटील असते, तर काँग्रेसवर ही वेळ आली असती का, असा प्रश्नही विचारला जात आहे. हा प्रश्न आहे विशाल पाटील यांना.
1957 च्या लोकसभेचा अपवाद वगळता 2014 पर्यंत जिल्ह्यात काँग्रेसचा खासदार होता. 2014 आणि 2019 मध्ये भाजप उमेदवार विजयी झाला. ही जागा पुन्हा मिळविण्यासाठी आता काँग्रेसला पोषक वातावरण असताना, गरज आहे ती खमकेपणाची. आक्रमकतेची, धाडसी निर्णय घेण्याची.
Latest Marathi News सांगली : मदनभाऊंप्रमाणे विशाल बंद दरवाजा फोडणार का? समाजमाध्यमातून विचारणा Brought to You By : Bharat Live News Media.