छत्तीसगडमध्ये भीषण अपघात, बस दरीत कोसळली, १२ जणांचा मृत्यू
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील दुर्गमध्ये भीषण अपघात झाला. दुर्ग जिल्ह्यातील कुम्हारी येथे बस ५० फूट खोल दरीत कोसळली. या घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. तर १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
मंगळवारी (दि.१०) रात्री ड्युटीवरून परतत असताना कर्मचाऱ्यांनी भरलेली बस दरीत पडली. बसमध्ये केडिया डिस्टिलरी फॅक्टरीचे सुमारे ४० कर्मचारी प्रवास करत होते. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
Latest Marathi News छत्तीसगडमध्ये भीषण अपघात, बस दरीत कोसळली, १२ जणांचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.