Crime News : अखेर पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पतीस अटक..

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला लाथा-बुक्क्यांनी व बांधकामासाठी लागणाऱ्या विटेने डोक्यात मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित पतीस पोलिसांनी तात्काळ अटक केल्याची माहिती ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली. कैलास जयराम हीलम (वय ३८, रा. तळेरान बोरीचीवाडी, ता. जुन्नर) असे संशयित पतीचे नाव असून देवकाबाई कैलास हिलम … The post Crime News : अखेर पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पतीस अटक.. appeared first on पुढारी.

Crime News : अखेर पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पतीस अटक..

ओतूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला लाथा-बुक्क्यांनी व बांधकामासाठी लागणाऱ्या विटेने डोक्यात मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित पतीस पोलिसांनी तात्काळ अटक केल्याची माहिती ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली. कैलास जयराम हीलम (वय ३८, रा. तळेरान बोरीचीवाडी, ता. जुन्नर) असे संशयित पतीचे नाव असून देवकाबाई कैलास हिलम (वय ३३) असे पतीच्या जबरी मारहाणीत खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मंगळवारी (दि. ९) दादाभाऊ चीमा मुकणे (वय ३५, रा. खिरेश्वर, ता. जुन्नर) यांनी ओतूर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून संशयित पतीला अटक केली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या घटनेत मयत पत्नी देवकाबाई कैलास हिलम हिस तिचा पती कैलास जयराम हिलम हा चारित्र्याचा संशय घेऊन मारहाण करीत असे. वसार (ता. अंबरनाथ, जि. ठाणे) व तळेरान बोरीची वाडी येथे कैलासने पत्नीला लाथा-बुक्क्यानी मारहाण करून डोक्यात विट घातल्याने तिचा मृत्यू झाला होता. ही घटना दि. १ ते ७ एप्रिल दरम्यान घडली असून पत्नी देवकाबाईचा सोमवारी (दि. ८) रात्री ८ वाजेदरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा तपास ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे हे करीत आहेत.
हेही वाचा

महिला मतांसाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न
मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा
पैठण : मोसंबीच्या बागेतील जुगार अड्ड्यावर पाचोड पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Crime News : अखेर पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पतीस अटक.. Brought to You By : Bharat Live News Media.