आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल. मेष : आज मागील काही काळापासून सुरू असलेल्या समस्येवर उपाय शोधल्यास दिलासा मिळेल. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीसाठी वेळ योग्य … The post आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? appeared first on पुढारी.

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : आज मागील काही काळापासून सुरू असलेल्या समस्येवर उपाय शोधल्यास दिलासा मिळेल. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीसाठी वेळ योग्य आहे. दुपारनंतरची परिस्थिती थोडी प्रतिकूल असू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरगुती खर्चासाठी संतुलित बजेट तयार करणे महत्त्वाचे ठरेल, अशी सूचना श्रीगणेश करतात. न्यायालयीन प्रकरणांमध्ये काही अडचणी येतील. व्यावसायिक स्पर्धक तुमच्यासमोर आव्हान उभे करू शकतात याची जाणीव ठेवा. कौटुंबिक वातावरणात आनंदी राहील. वातावरणातील बदलामुळे होणार्‍या आजारांपासून सावध रहा.
वृषभ : श्रीगणेश म्‍हणतात की, आज पाहुण्यांच्या स्वागतालमध्‍ये वेळ जाईल. कुटुंबाच्या सुखासाठी खर्च कराल. तरुणाई आपल्या भविष्यातील नियोजनाबाबत गंभीर असेल. तुमचे महत्त्वाच्‍या नियोजनात चूक होणार नाही यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे. व्यवसायात यावेळी अधिक मेहनत आणि परिश्रम करावे लागतील. पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद होऊ शकतो. घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्‍या.
मिथुन : श्रीगणेश सांगतात की, आज कठोर परिश्रमाच्‍या जोरावर तुम्हाला हवे ते सर्व साध्य करू शकता. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्‍यासाठी सर्वात मोठी संपत्ती ठरेल. कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्‍या. अन्‍यथा पैसे परत मिळणे कठीण होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नका. आळस टाळा. अन्‍यथा याचा परिणाम कौटुंबिक जीवनावर परिणाम होईल. तब्येतीच्‍या किरकोळ तक्रारी राहतील.
कर्क : आजचा दिवस कुटुंबासोबत आनंदात जाईल, असे श्रीगणेश सांगतात. तुम्‍हाला सकारात्‍मक बातमीही मिळेल. कार्यकुशलतेच्या सहाय्याने तुम्हाला हवे ते यश मिळेल; पण सगळं काही सुरळीत चाललं असलं तरी कुठेतरी कमीपणा जाणवेल. याचा विचार केला तर काही कारणच उरणार नाही. आपल्या भावना आणि रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात आनंदी वातावरण राहिल. जास्त मेहनतीमुळे थकवा जाणवेल.
सिंह : आज कोणत्याही संमेलनात किंवा समारंभाला जाण्याची संधी मिळेल. विवाह, नोकरी इत्यादी मुलांशी संबंधित कामे यशस्वी होतील. रागावर नियंत्रण ठेवा. एखाद्यावर जास्त अवलंबून राहणे हानिकारक ठरू शकते. घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तब्येत ठीक राहील; पण जुन्या आजाराबाबत काळजी घ्यावी लागेल.
कन्या : श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असेल. संयमाने वर्तन केल्‍यास मुले तुमचा आदर करतील. खर्चाचे योग्‍य व्‍यवस्‍थापन करा. नातेवाईकांशी व्यवहार करताना काळजी घ्या. बोलण्‍यावर नियंत्रण ठेवा, अन्‍यथा संबंध बिघडण्याची शक्यता आहे. काही प्रमाणात खर्चावर नियंत्रण आवश्यक राहिल. नवीन लोकांशी व्यावसायिक संबंध सुरू करण्यापूर्वी विचार करा. कुटुंबातील सदस्‍यांचे जिव्‍हाळ्याचे नाते कायम राहील. बद्धकोष्ठता, पोट फुगणे इत्यादी समस्या जाणवतील.
तूळ : श्रीगणेश म्हणतात की,आज तुम्हाला सर्व काही समर्पणाने करावे लागेल. याचे चांगले परिणाम देखील प्राप्त होतील. महिला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे विशेष लक्ष देतील. स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी वेळ योग्य आहे. त्याचा चांगला उपयोग करा. निष्काळजीपणा आणि दिरंगाईमुळे आवश्यक व महत्त्वाची कामे अपूर्ण राहू शकतात हे लक्षात ठेवा. आज एखादी घटना सन्मान दुखावणारी असू शकते. कामाचा दर्जा सुधारल्याने तुम्हाला चांगली ऑर्डर मिळू शकते. पती-पत्नीमधील मतभेद दूर होतील. डोकेदुखी, ताप इत्यादी हंगामी आजारांचा त्रास होवू शकतो.
वृश्चिक : आज परिस्थितीत सकारात्मक बदल झाल्‍याने अनेक संधी मिळतील, असे श्रीगणेश सांगतात. नवीन काही शिकायलाही वेळ लागेल. हा अनुभव तुम्हाला व्यावहारिक जीवनात पुढे उपयोगी पडणार आहे. चांगली बातमी मिळाल्‍याने सुखावाल. कौटुंबिक वातावरणात अशांतता राहील. भावंडांशी समन्वय राखा. उत्पन्नासोबत खर्चही वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
धनु : जमीन किंवा वाहनाशी संबंधित महत्त्वाचे काम पूर्ण होईल, असे श्रीगणेश सांगतात. नातेवाईकांसोबत वेळ व्‍यतित कराल. मुलाखतीतील यशामुळे तरुण वर्गाचा आत्मविश्वास वाढेल. प्रत्येकावर विश्वास ठेवू नये. भावनिक होवून निर्णय घेणे नुकसानकारक ठरु शकते. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला थोडा त्रास संभवतो. कौटुंबिक सदस्यांची कठीण प्रसंगी साथ मिळेल. रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी काळजी घ्‍यावी.
मकर : आज महत्त्वाची माहिती मिळू शकते, असे श्रीगणेश सांगतात. पैशाशी संबंधित कामे पूर्ण होतील. मात्र मुलांबद्दल एक प्रकारची चिंता राहील. विनाकारण भीती आणि अस्वस्थता राहील. परिणामी, तुम्ही तुमच्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करू शकणार नाही. कामात अधिक एकाग्रता असणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. संतुलित आहारासोबतच शारीरिक श्रम, व्यायाम यासारख्या गोष्टींकडेही लक्ष द्या.
कुंभ : आज ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल असल्‍याचे श्रीगणेश सांगतात. अडथळ्यांना न जुमानता तुम्ही सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. मित्र आणि सहकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. तुमचे बजेट तुमच्या गरजेनुसार मर्यादित आणि संतुलित ठेवा. तुम्ही जमीन किंवा वाहनासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर पुनर्विचार करा. शेतात कोणतेही काम थांबू शकते. बाहेरच्या व्यक्तीमुळे पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्‍या.
मीन : आज सकारात्मक लोकांशी संवाद साधल्यानेउत्तम वेळ जाईल. दैनंदिन कामांव्यतिरिक्त, तुम्ही इतर कामे सहजतेने पूर्ण कराल. काही लोकांमध्ये अपमानही होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असे श्रीगणेश सांगतात. प्रत्येक कठीण प्रसंगात कुटुंबातील सदस्य तुमच्या पाठीशी उभा राहील. सर्दी, खोकला, ऍलर्जीचा त्रास होण्‍याची शक्‍यता.
Latest Marathi News आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? Brought to You By : Bharat Live News Media.