महिला मतांसाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न

गोवा : गोव्यात महिला मतांचा टक्का अधिक आहे आणि निवडणुकीत मतदानात महिला पुढे असतात, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी महिला मतांवर भर दिला आहे. विधानसभा निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षणाचे आश्वासनही भाजपने दिले आहे. दक्षिण गोव्यात उद्योजिका पल्लवी धेंपे यांना रिंगणात उतरवल्यानंतर भाजपने काँगेस पक्षालाही महिला उमेदवार देण्याचे आव्हान दिले होते. परंतु, काँग्रेसने कॅ. व्हेरिएतो फर्नांडिस … The post महिला मतांसाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न appeared first on पुढारी.

महिला मतांसाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न

किशोर शेठ मांद्रेकर

गोवा : गोव्यात महिला मतांचा टक्का अधिक आहे आणि निवडणुकीत मतदानात महिला पुढे असतात, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी महिला मतांवर भर दिला आहे. विधानसभा निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षणाचे आश्वासनही भाजपने दिले आहे. दक्षिण गोव्यात उद्योजिका पल्लवी धेंपे यांना रिंगणात उतरवल्यानंतर भाजपने काँगेस पक्षालाही महिला उमेदवार देण्याचे आव्हान दिले होते. परंतु, काँग्रेसने कॅ. व्हेरिएतो फर्नांडिस यांना उमेदवारी दिली आहे. ख्रिस्ती मतदार आजवर काँग्रेसच्या बाजूने मतदान करत असल्यानेच या मतदार संघात ख्रिस्ती खासदार निवडून येण्याची परंपरा अखंडित राहिली आहे. अपवाद फक्त भाजपने दोन वेळा या मतदार संघातून विजय मिळवला आहे.
एसटी आरक्षणाचा फटका सत्ताधारी भाजपला बसू नये, यासाठीही केंद्रीय नेत्यांसह स्थानिक नेत्यांनी एसटी समाजाला विधानसभेत आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तरीसुद्धा मिशन फॉर एसटी रिझर्व्हेशन चळवळ चालवणार्‍या नेत्यांचे समाधान झाले नाही. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या संघटनेत पडलेली फूट ही भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. 40 सदस्यांच्या विधानसभेत एसटी समाजाला आरक्षणात विधानसभेत 4 ते 5 जागा तसेच महिलांना किमान 13 ते 14 जागा राखीव होणार आहेत. त्यात बहुसंख्येने असलेल्या भंडारी समाजानेही ओबीसींसाठी जागा आरक्षित कराव्यात, अशी मागणी केली आहे.
महिला आणि एसटी समाजाला आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. नव्या इच्छुकांना आताच आमदारकीचे गाजर दाखवले जात आहेत. तर काँग्रेस पक्षाने विशेषत: दक्षिणेची जागा कायम राखण्यासाठी एकगठ्ठा असलेल्या ख्रिस्ती मतांवर भर दिला आहे. आतापर्यंत या मतदारांनीच अधिकतर काँग्रेसच्या उमेदवारांना हात दिला आहे. नव्यानेच लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे उत्तरेतील मनोज परब आणि दक्षिणेतील रूबर्ट परेरा यांनी गोमंतकीयत्वाला प्राधान्य दिले आहे. परप्रांतीयांना प्रखर विरोध करत हा पक्ष गेल्या निवडणुकीत प्रथमच लढत विधानसभेत पोहोचला. त्याचा फटका काँग्रेसला बसला होता. आता लोकसभेतही राजकीय समीकरणे बदलण्याची ताकद आरजी पक्षात आहे.
सत्तेत असलेल्या भाजपकडे तब्बल 33 आमदारांचे बळ असताना विरोधक भाजपवर कुरघोडी करण्यात यशस्वी ठरणार का, हे पहावे लागेल. हे विरोधकांना सहज सोपे वाटत असले, तरी त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांना काँग्रेसमध्ये आजवर एकाही निवडणुकीत यश आलेले नाही. पाचवेळा खासदार असलेले आणि केंद्रात मंत्रिपद भूषवणार्‍या भाजपच्या श्रीपाद नाईक यांचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. दक्षिणेत भाजपने महिला उमेदवाराचा केलेला प्रयोग कितपत यशस्वी होतोय, हेही समजणार आहे.
दक्षिण गोव्यात आतापर्यंत चार वेळा अपराजित असलेले खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना हटवून त्यांच्या जागी भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कॅ. व्हेरिएतो फर्नांडिस आणि भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांच्यात प्रमुख लढत आहे. त्यात आरजीपीने रूबर्ट परेरा या युवा दमाच्या नेत्याला रिंगणात उतरवल्याने ही लढत तिरंगी होणार आहे. काँग्रेसला इंडिया आघाडीतील आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि तूणमूल काँग्रेस तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाची साथ आहे. दक्षिणेत काँग्रेसचे दोन आमदार आणि ‘आप’चे दोन तसेच गोवा फॉरवर्डचा एक आमदार आहे. उत्तरेत काँग्रेसकडे एकमेव आमदार आहे.
उत्तर गोवा उमेदवार
श्रीपाद नाईक : भाजप
रमाकांत खलप : काँग्रेस
तुकाराम (मनोज) परब : आरजी
दक्षिण गोवा उमेदवार
सौ. पल्लवी धेंपे : भाजप
कॅ. व्हेरिएतो फर्नांडिस : काँग्रेस
रूबर्ट परेरा : आरजी
Latest Marathi News महिला मतांसाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न Brought to You By : Bharat Live News Media.