हैदराबादने सामना जिंकला; पंजाबने मने

मुल्लनपूर; वृत्तसंस्था : पंजाब किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील शेवटपर्यंत रंगलेला सामना हैदराबादने 2 धावांनी जिंकला असला तरी पंजाबच्या शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली. दोघांनी 4 षटकांत 69 धावा करण्याचे टार्गेट जवळपास पूर्ण करीत आणले होते. परंतु, त्यांचा प्रयत्न दोन धावांनी कमी पडला. सनरायजर्स हैदराबाद संघाने 9 बाद 182 धावा … The post हैदराबादने सामना जिंकला; पंजाबने मने appeared first on पुढारी.

हैदराबादने सामना जिंकला; पंजाबने मने

मुल्लनपूर; वृत्तसंस्था : पंजाब किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील शेवटपर्यंत रंगलेला सामना हैदराबादने 2 धावांनी जिंकला असला तरी पंजाबच्या शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली. दोघांनी 4 षटकांत 69 धावा करण्याचे टार्गेट जवळपास पूर्ण करीत आणले होते. परंतु, त्यांचा प्रयत्न दोन धावांनी कमी पडला. सनरायजर्स हैदराबाद संघाने 9 बाद 182 धावा केल्या, तर पंजाबची गाडी 180 वर थांबली. शशांक (25 चेंडू 46 धावा) आणि आशुतोष (15 चेंडूंत 33 धावा) हे दोघे नाबाद राहिले. (PBKS vs SRH)
सनरायजर्स हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. त्यांचे जॉनी बेअरस्टो (0), प्रभसिमरनसिंग (4) आणि शिखर धवन (14) हे तिघे आघाडीचे फलंदाज 20 धावांत तंबूत परतले. सुरुवातीच्या धक्क्यांनंतर सॅम कुरेनने पंजाब किंग्जचा डाव सांभाळला. करणने सलग फटके खेळून हैदराबादच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्याने सिकंदर रझाला सोबत घेत धावा गोळा करण्यास सुरुवात केली; पण कुरेनचा हा संघर्ष नटराजनने संपुष्टात आणला. त्याने 22 चेंडूंत 29 धावा केल्या. तर रझाला उनाडकटने (28) बाद केले. नितीशकुमार रेड्डीने गोेलंदाजीतही योगदान देताना यष्टिरक्षक जितेश शर्माला (19) बाद केले.
यानंतर गेल्या सामन्यातील मॅचविनर जोडी शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांच्यावर विजय मिळवून देण्याची जबाबदारी आली; पण यावेळी टार्गेट मोठे होते, त्यांना 24 चेंंडूंत 69 धावा करायच्या होत्या. 17 व्या षटकात भुवनेश्वरकडून दोघांनी 17 धावा वसूल केल्या. पुढच्या षटकात कमिन्सने 11 धावा दिल्या. नटराजनने 10 धावा दिल्याने शेवटच्या षटकात 29 धावांचे रक्षण करण्याची जबाबदारी जयदेव उनाडकटवर आली. (PBKS vs SRH)
जयदेवच्या पहिल्या चेंडूवर षटकार बसला. चेंडू सीमारेषेवरील नितीशकुमारच्या हातातून दोरीच्या पलीकडे पडला. यामुळे उनाडकट दबावात आला, त्याने सलग दोन वाईड बॉल टाकले. तर पुढच्या चेंडूवर पुन्हा षटकार आला. त्यामुळे दोन चेंडूतच 14 धावा निघाल्या. त्यामुळे विजयी लक्ष्य 4 चेंडूंत 15 धावा असे सोपे झाले. यानंतर दोन चेेंडूंत चार धावा निघाल्या; पण पाचवा चेंडू वाईड पडला. त्यामुळे 2 चेंडूंत 10 धावांचे टार्गेट उरले. पाचव्या चेंडूवर चौकार किंवा षटकार अपेक्षित असताना एकधाव निघाली अन् पंजाबचा पराभव निश्चित झाला. शेवटच्या चेंडूवर शशांकसिंगने षटकार ठोकला. परंतु, ते टार्गेटपासून 2 धावा मागेच राहिले. शशांक आणि आशुतोष यांनी दिलेली झुंज मात्र चाहत्यांची मने जिंकून गेली.
तत्पूर्वी, पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कागिसो रबाडाने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर ट्रॅव्हिस हेडसाठी झेलबादची जोरदार अपील झाले; पण डीआरएस न घेतल्याने हेडला जीवदान मिळाले. त्यानंतर हेडने रबाडाच्या पुढच्या षटकात सलग 3 चौकार खेचले. अर्शदीप सिंगच्या पहिल्याच षटकात पंजाब किंग्जने मोठी विकेट मिळवली. हेडने (21) खेचलेला मोठा फटका उत्तुंग उडाला आणि मिड ऑफला उभा असलेल्या धवनने पळत चांगला झेल घेतला. अर्शदीपने एक चेंडूच्या अंतराने मार्करामला (0) बाद करून हैदराबादला 27 धावांवर दोन धक्के दिले. अभिषेक शर्मा (16) चांगल्या टचमध्ये दिसला. परंतु, सॅम कुरेनने त्याला माघारी पाठवले.
टॉप ऑर्डर अपयशी ठरल्यावर राहुल त्रिपाठी व नितीश कुमार रेड्डी यांनी आशेचा किरण दाखवला होता; पण हर्षल पटेलने ही जोडी तोडली. राहुल 11 धावांवर झेलबाद झाला, यावेळी जितेश शर्माने ‘डीआरएस’ घेतला व तो यशस्वी ठरला. हेन्रिक क्लासेनही (9) फेल गेला आणि हर्षल पटेलने ही विकेट मिळवली; पण नितीश खेळपट्टीवर उभा राहिला आणि त्याने 32 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. नितीश 37 चेंडूंत 64 धावा करून बाद झाला. हैदराबादाला 9 बाद 182 धावा करता आल्या.
हेही वाचा :

मनसेने महायुतीला पाठींबा दिल्यानंतर सीएम शिंदेची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘राज ठाकरेंचे आभार, आता विधानसभेसाठी…’
राज ठाकरेंची निवडणूकीपूर्वी शिवाजी पार्कवर सभा; ‘हे’ आहेत भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
Ramdas Athawale :  …तर मंत्रिपदाचा राजीनामा देईल : रामदास आठवले   

Latest Marathi News हैदराबादने सामना जिंकला; पंजाबने मने Brought to You By : Bharat Live News Media.