अर्शदीपनंतर सॅम करणचा हैदराबादला धक्का; अभिषेक शर्मा तंबूत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आज आयपीएलच्या 17 व्या हंगामातीस 23 वा सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. हा सामना चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (PBKS vs SRH)
अपडेट्स :
अर्शदीपनंतर सॅम करणचा हैदराबादला धक्का; अभिषेक शर्मा तंबूत
पॉवर प्लेमध्ये तीन फलंदाज बाद करत पंजाबने हैदराबादला बॅक फुटवर ढकलले आहे. सुरूवातीला अर्शदीपने हेड आणि मार्करम यांना बाद केल्यानंतर सॅम करणने अभिषेक शर्माला बाद करत हैदराबादला तिसरा झटका दिला. अभिषेक 11 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. सॅम करणने शशांक सिंगकरवी अभिषेकला बाद केले.
पंजाबला अर्शदीपचा दुहेरी धक्का; ट्रॅव्हिस पाठोपाठ मार्करम माघारी
पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि एडन मार्करम यांना बाद करून हैदराबादला सुरूवातीलाच बॅक फुटवर ढकलले. ट्रॅव्हिस हेड 15 चेंडूत 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अर्शदीपने त्याला शिखर धवनकरवी झेलबाद केले. हेड आणि अभिषेक शर्माने हैदराबादला वेगवान सुरुवात करून दिली होती, पण अर्शदीपने ही भागीदारी संपुष्टात आणली. यानंतर फलंदाजीसाठी आलेला एडन मार्कराम मैदानावर फारकाळ टिकला नाही. त्याला दोन बॉलच्या खेळीत खातेही उघडता आले नाही. अर्शदीपने त्याला जितेश शर्माकरवी झेलबाद केले.
दोन्ही संघ :
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, सॅम कुरन, शशांक सिंग, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.
इम्पॅक्ट प्लेयर : प्रभसिमरन सिंग, नॅथन एलिस, तनय थियागराजन, राहुल चहर, ऋषी धवन.
सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.
इम्पॅक्ट प्लेयर : उमरान मलिक, मयंक मार्कंडे, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी.
🚨 Toss Update 🚨@PunjabKingsIPL elected to bowl against @SunRisers.
Follow the Match ▶️ https://t.co/JP3mpkETgx #TATAIPL | #PBKSvSRH pic.twitter.com/mJcrD1W4Ae
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2024
हेही वाचा :
Loksabha Election 2024 : दिव्यांगाच्या मतासाठी यंत्रणा तेलंगणा सीमेवरील दुर्गम गावात
Ramdas Athawale : …तर मंत्रिपदाचा राजीनामा देईल : रामदास आठवले
शनिवारी सूर्याचा मेष राशीत प्रवेश : अग्नी आणि जलतत्त्वाच्या युतीमुळे ‘या’ राशींना लाभ | Sun Transit in Aries
Latest Marathi News अर्शदीपनंतर सॅम करणचा हैदराबादला धक्का; अभिषेक शर्मा तंबूत Brought to You By : Bharat Live News Media.
