
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सोनी मराठी वाहिनी नवी मालिका ‘जय जय शनिदेव’ घेऊन येत आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता ‘शनिदेव’ यांच्यावर आधारित ही नवी मालिका असणार आहे. (New Marathi TV Serial ) या मालिकेत काय पाहायला मिळेल आणि मालिकेचे स्वरूप कसे असेल, हेअजून गुलदस्त्यात आहे. मालिकेतील कलाकार अजून उघड केलेले नसले तरी मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (New Marathi TV Serial )
शनिदेव यांच्यावर आधारित मालिका पहिल्यांदाच दूरदर्शनवर पाहता येणार आहे. शनिदेवांचा इतिहास अजून कोणीही प्रेक्षकांसमोर आणलेला नाही. लवकरच तो सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे. मालिकेत कोण कलाकार असतील, मालिकेचा सारांश काय असेल; हे पुढे समजेलच.
Latest Marathi News नवी मालिका ‘जय जय शनिदेव’ लवकरच Brought to You By : Bharat Live News Media.
