विक्रमी उच्चांकानंतर सेन्सेक्स, निफ्टी सपाट, कोणते शेअर्स चमकले?

पुढारी ऑनलाईन : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (Gudhi Padwa 2024) मंगळवारी (दि.९) भारतीय शेअर बाजाराने नव्या विक्रमाला गवसणी घातली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ७५,१२४ च्या अंकाला स्पर्श केला. तर निफ्टीने पहिल्यांदाच २२,७६८ चा नवा उच्चांक गाठला. पण दुपारच्या व्यवहारात बाजारातील तेजी ओसरली आणि दोन्ही निर्देशांक सपाट झाले. सेन्सेक्स ५८ अंकाच्या किरकोळ घसरणीसह ७४,६८३ वर स्थिरावला. तर निफ्टी … The post विक्रमी उच्चांकानंतर सेन्सेक्स, निफ्टी सपाट, कोणते शेअर्स चमकले? appeared first on पुढारी.

विक्रमी उच्चांकानंतर सेन्सेक्स, निफ्टी सपाट, कोणते शेअर्स चमकले?

Bharat Live News Media ऑनलाईन : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (Gudhi Padwa 2024) मंगळवारी (दि.९) भारतीय शेअर बाजाराने नव्या विक्रमाला गवसणी घातली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ७५,१२४ च्या अंकाला स्पर्श केला. तर निफ्टीने पहिल्यांदाच २२,७६८ चा नवा उच्चांक गाठला. पण दुपारच्या व्यवहारात बाजारातील तेजी ओसरली आणि दोन्ही निर्देशांक सपाट झाले. सेन्सेक्स ५८ अंकाच्या किरकोळ घसरणीसह ७४,६८३ वर स्थिरावला. तर निफ्टी २३ अंकांनी घसरून २२,६४२ वर बंद झाला. (Stock Market Closing Bell)
टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स आणि टीसीएस सारख्या हेवीवेट्स शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे दिवसाच्या सुरुवातीला विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर दुपारी सेन्सेक्स आणि निफ्टीची तेजी काही प्रमाणात ओसरली आणि त्यांनी सपाट व्यवहार केला. सुरुवातीला बाजाराला विक्रमी उच्चांकावर पोहोचण्यास आयटी आणि ऑटो शेअर्समधील जोरदार खरेदीमुळे सपोर्ट मिळाला.
क्षेत्रीय पातळीवर मीडिया, ऑटो, कॅपिटल गॉड्स, एफएमसीजी ०.५-१ टक्क्यांनी घसरले. तर मेटल आणि रियल्टी प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक नकारात्मक पातळीवर बंद झाले.
टॉप गेनर्स, टॉप लूजर्स
सेन्सेक्सवर आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्स, एम अँड एम, टाटा स्टील हे शेअर्स तेजीत राहिले. तर टायटन, रिलायन्स, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले.

निफ्टीवर अपोलो हॉस्पिटल, हिंदाल्को, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस हे टॉप गेनर्स राहिले. तर टायटन, कोल इंडिया, हिरो मोटोकॉर्प, रिलायन्स, एशियन पेंट्स हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले.
अमेरिकेतील बाजारात सुस्ती, आशियात तेजी
अमेरिकेतील शेअर बाजारात सोमवारी सुस्त स्थिती दिसून आली होती. कारण आता गुंतवणूकदारांचे लक्ष १० एप्रिल रोजी जाहीर होणाऱ्या महागाईच्या आकडेवारीकडे लागले आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. अमेरिकेच्या बाजारातील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज ३० निर्देशांक ०.०३ टक्क्यांनी घसरून बंद झाला. तर S&P 500 ०.०४ टक्क्यांनी खाली आला. दरम्यान, Nasdaq Composite ०.०३ टक्क्यांनी वाढून बंद झाला. पण अमेरिकेच्या शेअर बाजारातील सुस्त स्थितीचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला नाही. सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी तेजीत व्यवहार केला. (Stock Market Closing Bell)
MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक ०.६ टक्क्यांनी वाढला. तर जपानचा निक्केई २२५ निर्देशांक १.१ टक्क्यांनी वाढला. दरम्यान, चीनचा शांघाय कंपोझिट वगळता आशियातील बहुतांश प्रमुख निर्देशांकांनी सकारात्मक व्यवहार केला. हाँगकाँगचा हँग सेंग आणि सिंगापूरचा एफटीएसई स्ट्रेट टाइम्स निर्देशांक तेजीत राहिले.
हे ही वाचा :

सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर! जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर
‘मल्टिअसेट अलोकेशन फंड’वरील कर आकारणी, जाणून घ्या याविषयी
जमाना ई-विमा पॉलिसीचा

Latest Marathi News विक्रमी उच्चांकानंतर सेन्सेक्स, निफ्टी सपाट, कोणते शेअर्स चमकले? Brought to You By : Bharat Live News Media.