ठाणे : गौण खनिज उत्पन्नातून कोकण विभागाची विक्रमी वसुली; १ हजार ११५ कोटींचे उत्पन्न

मुरबाड: कोकण विभागात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात गौण खनिज उत्खनन नियमापासून तब्बल १ हजार ११५ कोटी इतकी विक्रमी रक्कम वसूल करण्यात महसूल विभागास यश आले आहे. गौण खनिज उत्खनन नियमापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी कोकण विभागाला देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या १३५.८८ टक्के वसुली करण्यात आली असल्याची माहिती कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. … The post ठाणे : गौण खनिज उत्पन्नातून कोकण विभागाची विक्रमी वसुली; १ हजार ११५ कोटींचे उत्पन्न appeared first on पुढारी.

ठाणे : गौण खनिज उत्पन्नातून कोकण विभागाची विक्रमी वसुली; १ हजार ११५ कोटींचे उत्पन्न

बाळासाहेब भालेराव

मुरबाड: कोकण विभागात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात गौण खनिज उत्खनन नियमापासून तब्बल १ हजार ११५ कोटी इतकी विक्रमी रक्कम वसूल करण्यात महसूल विभागास यश आले आहे. गौण खनिज उत्खनन नियमापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी कोकण विभागाला देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या १३५.८८ टक्के वसुली करण्यात आली असल्याची माहिती कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. Thane News
शासन स्तरावरुन कोकण विभागासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता गौण खनिज उत्खनन नियमापासून ८२० कोटी उत्पन्न वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करुन दिले होते. हे उद्दिष्ट १०० टक्के साध्य करण्यासाठी सर्व यंत्रणांनी गौण खनिज उत्खनन नियमांचे काटेकोर पालन करुन त्यासाठी विशेष नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या होत्या. Thane News
त्यानुसार कोकण विभागाने कालबद्ध नियोजन करुन ३१ मार्च, २०२४ अखेरपर्यंत एकूण १ हजार ११५ कोटी उत्पन्नाची वसुली साध्य केली. कोकण विभागाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सर्व यंत्रणांचे अभिनंदन केले आहे.
Thane News  जिल्हानिहाय उत्पन्न वसुलीची माहिती पुढीलप्रमाणे :
मुंबई शहर ५३ कोटी रुपये, मुंबई उपनगर १८० कोटी, ठाणे २८८ कोटी २४ लाख, पालघर १६३ कोटी ७५ लाख, रायगड २८० कोटी ४२ लाख, रत्नागिरी ८४ कोटी ६६ लाख आणि सिंधुदूर्ग ५४ कोटी ७५ लाख इतकी वसुली करुन कोकण विभागाने गौण खनिज उत्पन्न वसुलीकरिता शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच १३५.८८ टक्के उत्पन्न साधन केले आहे.
हेही वाचा 

ठाणे : ढोलताशांच्या गजरात दुमदुमली नववर्ष स्‍वागत यात्रा; बदलापुरात यात्रेचा उत्‍साह
Lok Sabha Election 2024 : ठाणे, कल्याण अखेर शिवसेनेलाच!; पालघर भाजपला
ठाणे: एक कोटींचे दागिने चोरणाऱ्या सेल्समनला अटक

Latest Marathi News ठाणे : गौण खनिज उत्पन्नातून कोकण विभागाची विक्रमी वसुली; १ हजार ११५ कोटींचे उत्पन्न Brought to You By : Bharat Live News Media.