“संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” चित्रपटातील “मर्दमावळा गाणं पाहिलं का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध घेणाऱ्या “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” या चित्रपटाची अवघ्या महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा टीजर तसेच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या “उधळीन मी…” या प्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या गाण्याला रसिक प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातलं “मर्दमावळा…: हे धडाकेबाज … The post “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” चित्रपटातील “मर्दमावळा गाणं पाहिलं का? appeared first on पुढारी.
“संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” चित्रपटातील “मर्दमावळा गाणं पाहिलं का?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध घेणाऱ्या “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” या चित्रपटाची अवघ्या महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा टीजर तसेच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या “उधळीन मी…” या प्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या गाण्याला रसिक प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातलं “मर्दमावळा…: हे धडाकेबाज गाणं लाँच करण्यात आलं आहे. (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) दिव्य कुमार यांच्या दमदार आवाजात हे गीत स्वरबद्ध करण्यात आल आहे. येत्या २६ एप्रिल रोजी “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil)
दिव्यकुमार यांनी हे गाणं गायलं असून, मंगेश कांगणे यांच्या शब्दांना चिनार महेश यांचं दमदार संगीत आहे. शिवाजी दोलताडे यांचे दिग्दर्शन आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत.

डॉ. सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.
Latest Marathi News “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” चित्रपटातील “मर्दमावळा गाणं पाहिलं का? Brought to You By : Bharat Live News Media.