
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा बहुप्रतीक्षित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान”चे पहिले पोस्टर आज गुढीपाडव्याचे औचित्य साधून प्रदर्शित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी करताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आज या पोस्टरमध्ये सुबोध भावेंचा चित्रपटातील एक वेगळा लूक आणि पेहराव पाहता या चित्रपटाची भव्यता झळकून येत आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार आहे. ‘कट्यार काळजात घुसली‘ तसेच ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर‘ या चित्रपटाची संपूर्ण टीम या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे. त्याचबरोबर मुख्य म्हणजे प्रसिद्ध संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे.
View this post on Instagram
A post shared by Planet Marathi प्लॅनेट मराठी (@planet.marathi)
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या अजरामर कलाकृतीवरून प्रेरित, “संगीत मानापमान” हा संगीतमय चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शनास सज्ज होणार आहे.
View this post on Instagram
A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)
Latest Marathi News कट्यार काळजात घुसली‘नंतर सुबोध भावेचा “संगीत मानापमान” Brought to You By : Bharat Live News Media.
