Loksabha election | 356 मतदान केंद्रांवरील अधिकार्यांना निवडणूक प्रशिक्षण

कर्जत : Bharat Live News Media वृत्तसेवा : कर्जत-जामखेड मतदार संघातील 356 मतदान केंद्रांवरील सर्व अधिकारी व कर्मचार्यांना येथील दादा पाटील महाविद्यालयातील शारदाबाई पवार सभागृहात निवडणूक प्रशिक्षण देण्यात आले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नितीन पाटील, कर्जतचे तहसीलदार गुरु बिराजदार, जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांना माहिती देताना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील म्हणाले, कर्जत- जामखेड मतदारसंघातील 356 मतदान केंद्र असून, यामधील 1700 मतदान अधिकारी व कर्मचार्यांना आज प्रत्यक्षात मतदानासाठी आवश्यक असणारे सर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण दोन टप्प्यांमध्ये ठेवले आहे. सकाळी नऊ ते बारा व दुपारी दोन ते सहा अशी विभागणी करण्यात आली. प्रशिक्षणात मतदानाच्यावेळी अडचणींबाबत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोणता निर्णय घ्यावा, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. तसेच ईव्हीएम मशीन व विपीटी मशीन याबाबत सर्वांना प्रशिक्षण देण्यात आलेे.
हेही वाचा
कितीही दबाव येऊ द्या, मी तुमच्या मागे : शरद पवार
काँक्रिटचे बाकडे अंगावर पडून तीन चिमुकले जखमी..!
Lok Sabha Elections 2024 : ठाण्यासाठी शिंदे-ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला!
Latest Marathi News Loksabha election | 356 मतदान केंद्रांवरील अधिकार्यांना निवडणूक प्रशिक्षण Brought to You By : Bharat Live News Media.
