
नेवासा : Bharat Live News Media वृत्तसेवा : धारदार शस्त्राने वार करून एकास जखमी करणार्या तालुक्यातील जळके बुद्रुकचा पोलिस पाटील अशोक पुंड याच्याविरुद्ध वाढीव कलमासह गुन्हा नोंदवा, अशी मागणी जखमीच्या पत्नीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. दरम्यान, या पाटलाविरुद्ध पोलिसांनी प्रांताधिकार्यांकडे कारवाईसाठी अहवाल पाठविला. जळका येथील बळीराम दत्तात्रय नाईक याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी करण्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी गावच्या पोलिस पाटलाविरुद्ध गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
दरम्यान, पोलिस पाटील अशोक पुंड याने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या नाईक यांच्यावर नेवासा फाटा येथील एका खासगी दवाखाण्यात उपचार सुरू आहेत. नेवासा पोलिसांनी पोलिस पाटलाविरुद्ध 307 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे जखमीची पत्नी सुनीता नाईक व नातेवाईकांनी सोमवारी (दि. 8) रोजी दुपारी दोन वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन घटनेची माहिती दिली. यावेळी पोलिस पाटलाविरुद्ध वाढीव कलमे लावून गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. या गंभीर घटनेची दखल वेळीच पोलिसांनी न घेतल्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार असल्याचे सुनीता नाईक यांनी सांगितले.
हेही वाचा
काँक्रिटचे बाकडे अंगावर पडून तीन चिमुकले जखमी..!
Lok Sabha Elections 2024 : ठाण्यासाठी शिंदे-ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला!
दुष्काळी व्यथा : पिके आणि शेतकरीही संकटात..
Latest Marathi News ‘त्या’ पोलिस पाटलावर गुन्हा नोंदवा : जखमीच्या पत्नीची मागणी Brought to You By : Bharat Live News Media.
