महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा संपुष्टात, सांगलीची जागा अखेर ठाकरेंकडे

पुढारी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला मंगळवारी (दि.९) जाहीर करण्यात आला. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा संपुष्टात आला असल्याचे सांगत काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जाहीर केले. यानुसार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २१, काँग्रेसला १७ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागा लढणार आहे. सांगलीची जागा अखेर … The post महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा संपुष्टात, सांगलीची जागा अखेर ठाकरेंकडे appeared first on पुढारी.

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा संपुष्टात, सांगलीची जागा अखेर ठाकरेंकडे

Bharat Live News Media ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला मंगळवारी (दि.९) जाहीर करण्यात आला. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा संपुष्टात आला असल्याचे सांगत काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जाहीर केले.
यानुसार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २१, काँग्रेसला १७ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागा लढणार आहे. सांगलीची जागा अखेर ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले. यामुळे सांगलीची जागा काॅंग्रेस लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Lok Sabha Elections 2024 Maha Vikas Aghadi seat sharing)
उत्तर मुंबईची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातगणंगले, संभाजीनगर, सांगली या जागा सोडण्यात आल्या आहेत. तर राष्ट्रवादीला बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड या जागा दिल्या आहेत.
गुढीपाडव्या मुहूर्तावर झालेल्या आज इंडिया आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रपरिषदेवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते. शेकाप तसेच आम आदमी पक्षाचे नेतेही यावेळी होते.
भाजप हा खंडणीखोर पक्ष असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला.

Shiv Sena Uddhav faction will contest elections on 21 seats in Maharashtra, NCP SCP will contest elections on 10 seats and Congress on 17 seats.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/toM2Ijnz4A
— ANI (@ANI) April 9, 2024

Latest Marathi News महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा संपुष्टात, सांगलीची जागा अखेर ठाकरेंकडे Brought to You By : Bharat Live News Media.