चांदणी चौक मोकळा श्वास घेणार ! भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वाकडे

पौड रोड : Bharat Live News Media वृत्तसेवा : एनडीए चौकातील (चांदणी चौक) वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वेधभवनजवळ तयार करण्यात येत असलेल्या भुयारी मार्गाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. यामुळे हा मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने वाहनचालक व नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. चांदणी चौकात उड्डाणपूल व रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र, चांदणी चौक व वेदभवन परिसरातील वाहतूक असुरक्षित, विस्कळीत असल्याने वाहनचालकांसह नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने परिसरातील सोसायट्यांमधील रहिवाशांनी प्रशासनाच्या विरोधात गेल्या काळात आंदोलनही केले होते.
सोसायट्यांतून बाहेर पडल्यावर उजवीकडे म्हणजेच वारज्याकडे आणि डावीकडे म्हणजे कोथरूड, भुसारी कॉलनीकडे जाण्यासाठी कसे व कुठून बाहेर पडायचे, असा प्रश्न वाहनचालकांसमोर उभा राहत होता. मात्र, आता या ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्यात आला असून, त्यातून भुसारी कॉलनी, कोथरूड डेपोकडे वळता येणार आहे. कोथरूडच्या मार्गावरून मुंबई व मुळशी, बावधनकडे जाणार्यांसाठी जुन्या भुयारी मार्गाचा वापर होणार असल्याने वाहतूक सुरळीत होणार आहे. मात्र, दोन्ही भुयारी मार्गांजवळ दिशादर्शक फलक, गतिरोधक, तसेच सिग्नलदेखील लवकरात लवकर बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
चांदणी चौकातील भुयारी मार्गाचे काम आता अंमित टप्प्यात आले आहे. वाहतूक विभाग आणि महापालिकेच्या अधिकार्यांसमवेत लवकरच पाहणी करून हा मार्गा वाहतुकीसाठी खुला करण्यात होईल.
-अंकित यादव, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण
हेही वाचा
Gold Price Update | नाशिकमध्ये साेन्याचे दर ७३,५०० प्रति तोळा
दु्र्दैवी ! स्कॉर्पिओची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू
तरुणांमध्ये अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिसची समस्या, कारणे काय?
Latest Marathi News चांदणी चौक मोकळा श्वास घेणार ! भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वाकडे Brought to You By : Bharat Live News Media.
