पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी सुसाट..! आदल्या दिवशीच ‘इतक्या’ वाहनांची नोंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांनी जोरदार वाहनांची खरेदी केल्याचे समोर आले आहे. यात 7336 इंधनावरील वाहने तर 137 इलेक्ट्रिक वाहने पुणेकरांनी खरेदी केल्याची नोंद पुणे आरटीओत करण्यात आली आहे. गुढीपाडवा म्हटलं की, प्रत्येक जण नवीन वस्तूची खरेदी करण्यात गुंतलेला असतो. कोणी घर घेतं, कोणी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेतं तर … The post पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी सुसाट..! आदल्या दिवशीच ‘इतक्या’ वाहनांची नोंद appeared first on पुढारी.
पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी सुसाट..! आदल्या दिवशीच ‘इतक्या’ वाहनांची नोंद

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांनी जोरदार वाहनांची खरेदी केल्याचे समोर आले आहे. यात 7336 इंधनावरील वाहने तर 137 इलेक्ट्रिक वाहने पुणेकरांनी खरेदी केल्याची नोंद पुणे आरटीओत करण्यात आली आहे. गुढीपाडवा म्हटलं की, प्रत्येक जण नवीन वस्तूची खरेदी करण्यात गुंतलेला असतो. कोणी घर घेतं, कोणी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेतं तर कोणी वाहनांची खरेदी करतात. अशीच वाहन खरेदी केल्याची नोंद पुणे आरटीओ कडून करण्यात आली आहे. खरेदी केलेली वाहने घरी नेण्यासाठी पुणेकरांची शहरातील विविध शोरूमवर गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला लगबग पाहायला मिळाली.
अनेक जण मनोभावे आपल्या वाहनाची पूजा करून वाहन घरी नेताना दिसले. या वेळी अनेकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी पेढ्यांचे वाटपदेखील केले. तर अनेकांनी सजवलेल्या वाहनाला ऐटीत आपल्या घरीच नेले. नवीन खरेदी केलेल्या वाहनासोबतचा फोटोसुद्धा अनेकांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर टाकल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. मंगळवारी गुढीपाडवा असल्याने अनेकांनी आदल्या दिवशीच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आपली वाहने घरी नेल्याचे दिसले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांनी गेल्या आठ दिवसांपासून वाहन खरेदी करण्याची तयारी केली होती. ही सर्व वाहने पुणेकर सोमवारी आपापल्या घरी नेण्याच्या तयारीत असणार, हे जाणून पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आणि कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी वर्गाकडून अथक प्रयत्न करण्यात आले.
मुहूर्तावर अशी झाली वाहन खरेदी
वाहन प्रकार             खरेदी वाहन संख्या

मोटारसायकल         4221
कार                       2324
रिक्षा                      245
गुडस                     257
टॅक्सी                     190
बस                           45
इतर वाहन                 52
एकूण              7 हजार 336

हेही वाचा

हापूस वाढवणार नववर्षाची गोडी : गेल्या पाच वर्षांतील उच्चांकी आवक
दु्र्दैवी ! स्कॉर्पिओची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू
चीनमध्ये बनतो दगडांचा ‘खमंग’ खाद्यपदार्थ!

Latest Marathi News पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी सुसाट..! आदल्या दिवशीच ‘इतक्या’ वाहनांची नोंद Brought to You By : Bharat Live News Media.