डोंगराच्या निमुळत्या टोकावरून जाणारी ‘स्वर्गाची शिडी’!

वॉशिंग्टन : जगभरात अनेक अनोखी आणि थरारक वाटणारी ठिकाणे आहेत. त्यामध्येच ‘स्वर्गाची शिडी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका ठिकाणाचा समावेश होतो. डोंगराच्या निमुळत्या टोकावरून जाणारी ही शिड्यांची पायवाट. या आहेत जणू काही स्वर्गात नेणार्‍या पायर्‍या! हवाई बेटांवरील केनोही डोंगरावर या हायकू स्टेअर्स म्हणजे पायर्‍या आहेत. स्वर्गाच्या या पायर्‍यांची संख्या जवळपास 3 हजार 922 एवढी आहे. या … The post डोंगराच्या निमुळत्या टोकावरून जाणारी ‘स्वर्गाची शिडी’! appeared first on पुढारी.

डोंगराच्या निमुळत्या टोकावरून जाणारी ‘स्वर्गाची शिडी’!

वॉशिंग्टन : जगभरात अनेक अनोखी आणि थरारक वाटणारी ठिकाणे आहेत. त्यामध्येच ‘स्वर्गाची शिडी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका ठिकाणाचा समावेश होतो. डोंगराच्या निमुळत्या टोकावरून जाणारी ही शिड्यांची पायवाट. या आहेत जणू काही स्वर्गात नेणार्‍या पायर्‍या! हवाई बेटांवरील केनोही डोंगरावर या हायकू स्टेअर्स म्हणजे पायर्‍या आहेत. स्वर्गाच्या या पायर्‍यांची संख्या जवळपास 3 हजार 922 एवढी आहे. या पायर्‍या चढून जाणं हे तसं आव्हान आहे. पण, आजूबाजूचा निसर्ग आणि तिथलं वातावरण पाहता, स्वर्गाच्या वाटेवर एकदा जावंच असं प्रत्येकाला वाटतं. डोंगराच्या पायथ्यापासूनच्या या शिड्या मध्येच धुक्यात हरवतात.
कधी कधी तर एखादा ढगच या पायर्‍यांवर विसावलेला दिसतो. तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल, की या पायर्‍या बांधल्या कुणी? या पायर्‍या बांधल्या अमेरिकन नेव्हीनं. 1940 साली दुसर्‍या महायुद्धाच्या काळात या डोंगरावर एक रेडिओ स्टेशन बांधण्यात आलं. या रेडिओ स्टेशनद्वारे अमेरिकन नौदलाकडून प्रशांत महासागरातील त्यांच्या जहाजांशी संपर्क प्रस्थापित केला जायचा. कालांतरानं हे रेडिओ स्टेशन बंद करण्यात आलं. पण, या रेडिओ स्टेशनपर्यंत जाणार्‍या पायर्‍या लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिल्या.
1970 साली दररोज जवळपास 75 पर्यटक या पायर्‍या चढून रेडिओ स्टेशनपर्यंत जायचे. पण, नंतर 1978 साली या पायर्‍यांवर जाण्यास तिथल्या प्रशासनानं बंदी घातली. पोलिस आणि पहारेकर्‍यांची नजर चुकवून रोज अनेक पर्यटक या स्वर्गाच्या वाटेवर जातात. 2016 मध्ये होनूलोलूच्या स्थानिक प्रशासनानं या पायर्‍या काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं एक साहसी रस्ता कायमचा इतिहास जमा होणार आहे.
Latest Marathi News डोंगराच्या निमुळत्या टोकावरून जाणारी ‘स्वर्गाची शिडी’! Brought to You By : Bharat Live News Media.