नाशिकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आज स्वागतयात्रा; नववर्षाचे जल्लोषात स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच गुढीपाडवा. चैतन्य आणि मांगल्याचा हा सण मंगळवारी (दि. ९) साजरा करण्यात येत आहे. गुढीपाडव्यानिमित्ताने शहरातून ठिकठिकाणांहून शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. नूतन वर्षाच्या पहिला दिवस अर्थात गुढीपाडव्यासाठी नाशिककर सज्ज आहे. घराेघरी स्नेह, मांगल्या व आनंदीची गुढी उभारण्यात येणार आहे. गुढीसाठी लागणारी वेळूची काठी, रेशमी वस्त्रे, साखरेचे कडगाठी … The post नाशिकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आज स्वागतयात्रा; नववर्षाचे जल्लोषात स्वागत appeared first on पुढारी.

नाशिकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आज स्वागतयात्रा; नववर्षाचे जल्लोषात स्वागत

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच गुढीपाडवा. चैतन्य आणि मांगल्याचा हा सण मंगळवारी (दि. ९) साजरा करण्यात येत आहे. गुढीपाडव्यानिमित्ताने शहरातून ठिकठिकाणांहून शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
नूतन वर्षाच्या पहिला दिवस अर्थात गुढीपाडव्यासाठी नाशिककर सज्ज आहे. घराेघरी स्नेह, मांगल्या व आनंदीची गुढी उभारण्यात येणार आहे. गुढीसाठी लागणारी वेळूची काठी, रेशमी वस्त्रे, साखरेचे कडगाठी तसेच पूजेचे साहित्य खरेदीकरिता सोमवारी (दि. ८) बाजारपेठेत लगबग पाहायला मिळाली. त्यामुळे बाजारपेठेतील उत्साह संचारला आहे.
गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागत समित्यांतर्फे शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. नाशिक पश्चिम विभागातून सहा ठिकाणांहून शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व शोभायात्रा कॉलेज रोड येथे एकत्रित येणार आहे. याशिवाय जुने नाशिक, पंचवटी, इंदिरानगर, सातपूर आणि नाशिक राेड आदी भागांंमधूनही शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रांमध्ये मराठी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येईल.
गुढीमागील शास्त्रीय कारण
महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुढी उभारण्याची परंपरा आजही जपली जात आहे. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या (गडू) बसवून गुढी साकारली जाते. ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते.
हेही वाचा:

Gudi Padwa 2024 : गुढीपाडवा विजयोत्सवाचा
Gudi Padwa 2024 | गुढीपाडवा : जाणून घ्या गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत
Horoscope | गुढीपाडव्या दिवशी होत आहे बुध गोचर; ‘या’ राशी होतील मालामाल

Latest Marathi News नाशिकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आज स्वागतयात्रा; नववर्षाचे जल्लोषात स्वागत Brought to You By : Bharat Live News Media.