सांघिक कामगिरीमुळे विजय : रोहित शर्मा

मुंबई, वृत्तसंस्था : ‘आयपीएल 2024’च्या 20 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव करत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आपले विजयाचे खाते उघडले आहे. या सामन्यानंतर रोहित शर्माला मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये ‘स्टार ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर रोहितने खेळाडूंशी संवाद साधताना सांघिक कामगिरीमुळे सामना जिंकल्याचे सांगितले. रोहित शर्मा खेळाडूंशी संवाद साधताना म्हणाला, आपली … The post सांघिक कामगिरीमुळे विजय : रोहित शर्मा appeared first on पुढारी.

सांघिक कामगिरीमुळे विजय : रोहित शर्मा

मुंबई, वृत्तसंस्था : ‘आयपीएल 2024’च्या 20 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव करत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आपले विजयाचे खाते उघडले आहे. या सामन्यानंतर रोहित शर्माला मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये ‘स्टार ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर रोहितने खेळाडूंशी संवाद साधताना सांघिक कामगिरीमुळे सामना जिंकल्याचे सांगितले.
रोहित शर्मा खेळाडूंशी संवाद साधताना म्हणाला, आपली फलंदाजी सुरेख झाली. पहिल्या सामन्यापासून अशा कामगिरीच्या आपण प्रतीक्षेत होतो. यातून हे दिसते की वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत. सगळ्या फलंदाजांची एकत्रित कामगिरी महत्त्वाची ठरते. संघ म्हणून जे लक्ष्य होते ते साध्य केल्यामुळेच इतकी मोठी धावसंख्या आपण उभारू शकलो. आपण बर्‍याच काळापासून अशा सांघिक कामगिरीबद्दल बोलत आहोत आणि फलंदाजी प्रशिक्षक मार्क बाऊचर आणि कर्णधाराला हेच अपेक्षित आहे. अशीच कामगिरी पुढे करत राहू. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 11 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.
मुंबई इंडियन्सच्या कोणत्याही खेळाडूने या सामन्यात 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या नाहीत, तरीही संघाने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 234 धावा केल्या. रोहित आणि इशान किशन यांनी मिळून 7 षटकांत 80 धावा जोडल्या आणि त्यानंतर टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड यांनी मिळून अखेरच्या षटकांमध्ये संघाला या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. इशान 42 धावा करून बाद झाला. टीम डेव्हिडने नाबाद 42 आणि रोमारियो शेफर्डने नाबाद 39 धावा केल्या. शेफर्डने 10 चेंडूंत 39 धावा केल्या आणि तो या सामन्याचा सामनावीर ठरला.
Latest Marathi News सांघिक कामगिरीमुळे विजय : रोहित शर्मा Brought to You By : Bharat Live News Media.