कोल्हापूर : रंकाळा टॉवर खूनप्रकरणी 8 हत्यारांसह 4 वाहने हस्तगत
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : रंकाळा टॉवर येथील मध्यवर्ती चौकात भरदिवसा झालेल्या अजय ऊर्फ रावण दगडू शिंदे (रा. डवरी वसाहत, यादवनगर) याच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या संशयितांकडून जुना राजवाडा पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली 8 हत्यारे, रक्ताळलेले कपडे, एका मोटारीसह 3 दुचाकी हस्तगत केली आहेत. संशयितांना कोणी रसद पुरविली आहे का, याचाही पोलिस शोध घेत आहेत.
यादवनगर, डवरी वसाहतीसह परिसरातील वर्चस्व वादातून सराईत गुन्हेगार अजय शिंदे याचा गुरुवारी (दि.4) येथील रंकाळा टॉवर परिसरात सशस्त्र टोळीने हल्ला करून खून केला होता. याप्रकरणी प्रतिस्पर्धी टोळीचा म्होरक्या रोहित अर्जुन शिंदे व त्याच्या आठ साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. संशयित सध्या पोलिस कोठडीत आहेत. डवरी वसाहत येथील चौकात सकाळ, सायंकाळ साथीदारासमवेत ठिय्या मारून म्होरक्या अजय उर्फ रावण विरोधी गटातील संशयितांना सतत खुन्नस देत होता. वेळीच त्याची गेम केली नाही तर तो आपल्या टोळीतील दोघा- तिघांची नक्की गेम करेल, अशी त्यांना भीती होती.
एकाचवेळी हल्ल्याचा संशयितांचा झाला होता प्लॅन !
अजय उर्फ रावणची गेम करण्यासाठी प्लॅनही ठरला होता. एकाचवेळी सगळ्यांनी हल्ला करायचा कट होता. त्यामुळे सर्वांनी शस्त्रे विकत घेतली होती, अशी कबुली संशयितानी पोलिसांना दिली आहे. अजय उर्फ रावण हा सराईत गुन्हेगार असून त्याची गेम करण्यासाठी संशयितांना कोणी सुपारी दिली असावी का, याचाही पोलिस शोध घेत आहेत.
Latest Marathi News कोल्हापूर : रंकाळा टॉवर खूनप्रकरणी 8 हत्यारांसह 4 वाहने हस्तगत Brought to You By : Bharat Live News Media.