बेळगाव कॅन्टोन्मेंटच्या सीईओनी जीवन संपवले
बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : कर्मचारी भरती गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय चौकशीचा ससेमिरा लागलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ आयएएस अधिकारी आनंद के. यांनी कॅम्प येथील आपल्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवन संपवले. शनिवार (दि.२५) सकाळी ही घटना घडली असून कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डातील १९ जागांसाठी झालेल्या कर्मचारी भरतीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार सीबीआकडे करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून सीबीआयचे अधिकारी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ व इतर अधिकारी आणि भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करत होते. चौकशीचा ससेमिरा लागल्याने आज सीईओ आनंद के. यांनी टोकाचे पाऊल उचलले.
हेही वाचा :
शिवकुमारांना दिलासा; विरोधक हताश
संतापजनक : कर्नाटकातील शाळेत ब्राह्मण मुलीला अंडे खायची जबरदस्ती, मुलीला मानसिक धक्का
निपाणी शहर बनतेय गांजा तस्करीचे केंद्र
The post बेळगाव कॅन्टोन्मेंटच्या सीईओनी जीवन संपवले appeared first on पुढारी.
बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : कर्मचारी भरती गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय चौकशीचा ससेमिरा लागलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ आयएएस अधिकारी आनंद के. यांनी कॅम्प येथील आपल्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवन संपवले. शनिवार (दि.२५) सकाळी ही घटना घडली असून कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डातील १९ जागांसाठी झालेल्या कर्मचारी भरतीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार सीबीआकडे करण्यात आली …
The post बेळगाव कॅन्टोन्मेंटच्या सीईओनी जीवन संपवले appeared first on पुढारी.