मावळ्याला सरदार कुणी केले? : वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री राजा का बेटा राजा होतो,आमच्याकडे कार्यकर्ता राजा..  असे काल म्हणाले, मुळात त्यांना जहागीरदार कोणी बनवलं. मावळ्याचा सरदार केला, सरदारचा जहागिरदार केला.आता राजा होण्याचे स्वप्न ते पाहत आहेत.ज्यांनी राजा केला त्याच्याच डोक्यावर पाय ठेवून राजा होण्याचा हा प्रकार असून हे जनता सहन करणार नाही. शेवटी कोण शिवसेना वाचवते, येणारा काळ आणि … The post मावळ्याला सरदार कुणी केले? : वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला appeared first on पुढारी.

मावळ्याला सरदार कुणी केले? : वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : मुख्यमंत्री राजा का बेटा राजा होतो,आमच्याकडे कार्यकर्ता राजा..  असे काल म्हणाले, मुळात त्यांना जहागीरदार कोणी बनवलं. मावळ्याचा सरदार केला, सरदारचा जहागिरदार केला.आता राजा होण्याचे स्वप्न ते पाहत आहेत.ज्यांनी राजा केला त्याच्याच डोक्यावर पाय ठेवून राजा होण्याचा हा प्रकार असून हे जनता सहन करणार नाही. शेवटी कोण शिवसेना वाचवते, येणारा काळ आणि जनता ठरवेल असे प्रतिपादन विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी करीत मुख्यमंत्र्यांना सबुरीचा सल्ला दिला.

नागपुरातील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष्य केले त्यावरून वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना निशाणा साधला.

सांगली जागेच्या तोडगा संदर्भात बोलताना कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, मार्ग काढू असे नाना पटोले बोलले आहेत. संजय राऊत यांनी आघाडी धर्म पाळताना सामंजस्याने भूमिका ठेवावी. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीशी आघाडी बाबत छेडले असता ऍड प्रकाश आंबेडकर यांनी साक्षगध होण्यापूर्वी पसंत केले होते. त्यांनी लग्नासाठी का नकार दिला, हुंड्यासाठी जे काही अपेक्षित होत त्यासाठी चर्चा करायची होती मात्र त्यांनी लग्नच तोडल्याचे सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत म्हणाले, भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, सत्ता टिकवण्यासाठी कितीही सभा घेतल्या तरी जनता त्याना स्वीकारणार नाही. विजय मविआचाच होईल, लोकं भाषण ऐकायला जातात, पण मतदान करत नाही. एकनाथ खडसे भाजप प्रवेश विषयी गळ्याला फास लागला बिचारे काय करणार, संजयसिंगला फसवत बेजार केलं, या वयात अधिक त्रास सहन करण्यापेक्षा मानसिक त्रासामुळे बदल करण्याची भूमिका घेतली असावी असे स्पष्ट केले.

अमरावतीत राणा- कडू वादावर बोलताना राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात. राजकारण स्वार्थी झाले आहे, राजकारण नासवल आहे, राणा कशा  बोलतात. राणा कुणाचा भरवशावर निवडून आल्या, शरद पवार या जेष्ठ नेत्याचा आशीर्वाद आणि काँग्रेसच्या मतामुळे त्यांनी निवडून आल्या होत्या.आता राणाची भूमिका बदलली, लोक यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ज्याला वैचारिक व्यासपीठ नाही. स्वार्थी मतलबी संपत्ती वाचवण्यासाठी केसेस काढून घेण्यासाठी कधी काय नाव घेते, आज देवाचं नाव घेतील उद्या रावणाचे नाव घेतील.

मावळ उमेदवाराने असे वक्तव्य करण्याची गरज नाही मात्र निवडणूक आयोग अशा वक्तावर काय करते ते बघावे लागेल , फक्त विरोधकांकडे बघता का सत्ताधाऱ्यांकडे बघता हे आता दिसेल. देशातील निवडणुका निष्पक्ष होतील अशी अपेक्षा आहे. आयोगाने बटीक बनवून काम करू नये अशी जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे. दरम्यान, संजय निरुपम यांना आम्ही काढून टाकले आता कुठे जाऊ द्या, चण्याच्या झाडावर जाऊदे ,हरभऱ्याच्या झाडावर चढू दे, चिखलात रुतून काय करायचं तेच करू देत,आमचं काही देणं घेणं नाही असेही वडेट्टीवार म्हणाले.
Latest Marathi News मावळ्याला सरदार कुणी केले? : वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला Brought to You By : Bharat Live News Media.