वर्धा : धाडी शिवारातील घाटात भीषण अपघात! एसटी बस पलटी होऊन पाच जण गंभीर तर २५ हून अधिक प्रवासी जखमी
वर्धा; Bharat Live News Media वृत्तसेवा : वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धाडी शिवारात घाटामध्ये एसटी बस पलटी झाल्याने पाच प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच बसमधील ३१ प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. हा अपघात सोमवारी ८ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार वरुड आगाराची एम एच बस वरुड येथून तळेगावकडे जात होती. दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकल चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने ही एसटी बस पलटी झाल्याचे सांगण्यात येते. या बसमध्ये 44 प्रवासी प्रवास करीत होते. बस पलटी होताच येथे मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. काही नागरिकांनी आष्टी पोलीस स्टेशनला सूचना दिली तर काहींनी 108 रुग्णवाहिकेला कॉल करून घटनास्थळी बोलावले. रुग्णवाहिका येताच गंभीर जखमी प्रवाशांना प्रवाशांना अमरावती येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्य जवळपास ५ जण गंभीर तर ३१ प्रवासी जखमी झाल्याचे संगण्यात येते. जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पोलिसांची पुढील कार्यवाही सुरु होती.
Latest Marathi News वर्धा : धाडी शिवारातील घाटात भीषण अपघात! एसटी बस पलटी होऊन पाच जण गंभीर तर २५ हून अधिक प्रवासी जखमी Brought to You By : Bharat Live News Media.