जळगाव जिल्ह्यात 62 कोटींचे स्टॅम्प पेपर नष्ट होणार

जळगाव : नरेंद्र पाटील; देशात आणि राज्यात गाजलेला तेलगी घोटाळा प्रकरण उघड झाल्यानंतर राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयात कोट्यवधी रुपयांच्या मुद्रांक पेपरची विक्री 2015 नंतर थांबविण्यात आली होती. आता हेच स्टॅम्प पेपर नष्ट करण्याचे आदेश आणि मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आलेली आहेत. जळगाव जिल्ह्यात 62 कोटी 71 लाख दहा हजार रुपयांचे स्टॅम्प पेपर नष्ट करण्यात … The post जळगाव जिल्ह्यात 62 कोटींचे स्टॅम्प पेपर नष्ट होणार appeared first on पुढारी.
#image_title

जळगाव जिल्ह्यात 62 कोटींचे स्टॅम्प पेपर नष्ट होणार

जळगाव : नरेंद्र पाटील; देशात आणि राज्यात गाजलेला तेलगी घोटाळा प्रकरण उघड झाल्यानंतर राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयात कोट्यवधी रुपयांच्या मुद्रांक पेपरची विक्री 2015 नंतर थांबविण्यात आली होती. आता हेच स्टॅम्प पेपर नष्ट करण्याचे आदेश आणि मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आलेली आहेत. जळगाव जिल्ह्यात 62 कोटी 71 लाख दहा हजार रुपयांचे स्टॅम्प पेपर नष्ट करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच एक त्रिस्तरीय सदस्य कमेटी स्थापन होऊन त्यांच्या देखरेखीखाली हे सर्व स्टॅम्प पेपर नष्ट करण्यात येणार आहे.
स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरणी तेलगी प्रकरण उघड झाल्यानंतर राज्यातील सर्व जिल्हा कोषागार विभागांमध्ये पाच हजार, दहा हजार, पंधरा हजार, वीस हजार, पंचवीस हजार रुपये किमतीचे स्टॅम्प पेपरची विक्री 23 जानेवारी 2015 पासून थांबविण्यात आली होती. हे संपूर्ण स्टॅम्प पेपर जिल्हा कोषागार विभागात सुरक्षित ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर स्टॅम्प पेपरच्या डिझाइनमध्ये शासनाने बदल केलेला आहे.
सदरील स्टॅम्प नष्ट करण्यासाठी 12 एप्रिल 2023 रोजी शासनाला पत्र दिलेले आहे. या स्टॅम्प पेपरचा भविष्यात दुरुपयोग होऊ नये म्हणून तीन सदस्य समितीच्या देखरेखीखाली हे स्टॅम्प पेपर जाळण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावर या कमिटीमध्ये अध्यक्ष, सचिव आणि सभासद असे असणार आहेत. यात अध्यक्षपदी मुद्रांक जिल्हाधिकारी, सचिव पदी अप्पर कोषागार अधिकारी आणि सदस्य पदी कोषागार अधिकारी हे तीन सदस्य असणार आहेत. जीआर आलेला असून कमिटी स्थापन झालेली आहे. मात्र त्यामध्ये त्या सदस्यांचे नाव नसल्याने आणि त्यांची बैठक लागलेली नाही. बैठक लागल्यानंतर सदरील समितीच्या देखरेखीखाली एका विशिष्ट दिवशी हे सर्व स्टॅम्प पेपर नष्ट करण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्याच्या कोषागारात 23 जानेवारी 2015 पासून विक्री असलेल्या स्टॅम्प पेपर खालील प्रमाणे आहेत:

एका स्टॅम्प ची किंमत
शिल्लक स्टॅम्प नग
एकूण किंमत

5000
12365
61825000

10000
5227
52270000

15000
17776
266640000

20000
6825
136500000

25000
4395
109875000

या 2015 पासून विक्री न झालेल्या स्टॅम्प पेपरची किंमत 62 कोटी 71 लाख दहा हजार रुपये आहे. लवकरच या त्रिस्तरीय समितीच्या समोर हे सर्व स्टॅम्प पेपर नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती कोषागार अधिकारी श्री खैरनार यांनी दिली आहे.
हेही वाचा :

राज्यातील सर्व समाजाच्या सर्वेक्षणासाठी तयारी..
UP No non-veg day| उत्तर प्रदेशमध्ये आज ‘No non-veg day’; जाणून घ्या काय कारण?
Pune News : आरोग्य योजनांचा लाभ अत्यल्प

The post जळगाव जिल्ह्यात 62 कोटींचे स्टॅम्प पेपर नष्ट होणार appeared first on पुढारी.

जळगाव : नरेंद्र पाटील; देशात आणि राज्यात गाजलेला तेलगी घोटाळा प्रकरण उघड झाल्यानंतर राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयात कोट्यवधी रुपयांच्या मुद्रांक पेपरची विक्री 2015 नंतर थांबविण्यात आली होती. आता हेच स्टॅम्प पेपर नष्ट करण्याचे आदेश आणि मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आलेली आहेत. जळगाव जिल्ह्यात 62 कोटी 71 लाख दहा हजार रुपयांचे स्टॅम्प पेपर नष्ट करण्यात …

The post जळगाव जिल्ह्यात 62 कोटींचे स्टॅम्प पेपर नष्ट होणार appeared first on पुढारी.

Go to Source