राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बाळासाहेब मिसाळ

आष्टी; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये दोन गट पडल्याने दोन्ही गटाच्या वतीने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. आष्टी तालुक्यातील हातोळण येथील बाळासाहेब मिसाळ यांनी शरदचंद्र पवार पक्षासाठी आजपर्यंत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन आज त्यांची (दि.८) शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत … The post राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बाळासाहेब मिसाळ appeared first on पुढारी.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बाळासाहेब मिसाळ

आष्टी; Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये दोन गट पडल्याने दोन्ही गटाच्या वतीने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. आष्टी तालुक्यातील हातोळण येथील बाळासाहेब मिसाळ यांनी शरदचंद्र पवार पक्षासाठी आजपर्यंत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन आज त्यांची (दि.८) शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांची निवड झाली.
तालुक्यातील बाळासाहेब मिसाळ हे २०१९ पासून शरदचंद्र पवार यांचे व‌ पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अग्रेसर आहेत. मिसाळ यांनी बहुजन मुक्ती पार्टीमध्ये अनेक वर्ष काम केले.२०१९ सालपासून ते शरद पवार यांच्या सानिध्यात राहून त्यांचे विचार व पक्षाचे ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहचवले. व पक्षाची एकनिष्ठता व आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेला जनसंपर्क यामुळे त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, राजेंद्र वैद्य, प्रभारी रायगड व प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महिला विभागीय अध्यक्षा भावना घाणेकर, संभाजी गांगर्डे, मनोहर वाघ, जगन्नाथ वाघ, कामगार नेते भाई संतोष घरत, डॉ. राजेंद्र कवठेकर, तुषार वाघ, गणेश चौधरी, शितल खाडे, सत्यनारायण बिरादार, राजेंद्र इंगोले, ह.भ .प देशमुख महाराज शेखर मगर आदी मान्यवर उपस्थित होते.
बाळासाहेब मिसाळ यांच्या निवडीबद्दल आ. संदिप क्षिरसागर, माजी आ. साहेबराव दरेकर,लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे, बबन गिते, राम खाडे, तालुकाध्यक्ष परमेश्वर शेळके, जिल्हा सरचिटणीस संजय थोरवे यांच्यासह  आदींनी या निर्णयाचे स्वागत केले.
हेही वाचा :

तुम्ही एक भुजबळ पाडाल आम्ही १६० उमेदवार पाडू! ओबीसी नेत्याचा जरांगे पाटलांना इशारा

Hingoli Lok Sabha : हिंगोली लोकसभेसाठी ३३ उमेदवार रिंगणात; १५ अपक्षांची माघार, चौरंगी लढत

Jalgaon Lok Sabha 2024 | निवडणूक विषयक प्रशिक्षणात अनुपस्थित 1410 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

Latest Marathi News राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बाळासाहेब मिसाळ Brought to You By : Bharat Live News Media.