काँग्रेस देशापुढील समस्यांची जननी : चंद्रपुरात पीएम मोदींचा हल्लाबोल

नागपूर, चंद्रपूर: Bharat Live News Media वृत्तसेवा : कारले तुपात आणि साखरेत कितीही घोळले तरी कडू ते कडूच या शब्दांत काँग्रेस ही देशापुढील अनेक समस्यांची जननी असून काँग्रेसने जनाधार गमावला आहे. तर दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वात एनडीएने अयोध्येतील राम मंदिर, काश्मीरच्या दृष्टीने महत्वाच्या अनेक प्रलंबित प्रश्नांचे कायम समाधान देशाला दिले आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर धर्म, जातीच्या नावावर विभाजन, तुष्टीकरणाचे राजकारण, लालआतंक अर्थात नक्षलवाद वाढीला काँग्रेसचे धोरणच कारणीभूत असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.८) केला. PM Modi on Congress
महाराष्ट्रातील पहिल्या लोकसभा निवडणूक प्रचार जाहीर सभेच्या निमित्ताने ते चंद्रपूरमध्ये बोलत होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे जात आहेत. असे सांगतानाच कधीकाळी बाळासाहेब ठाकरे काँग्रेस विरोधात होते. आज काँग्रेस नकली शिवसेनावाल्यांसोबत रॅली करीत असल्याचे टीकास्त्रही त्यांनी सोडले. माता महाकाली महाकालीच्या पावनभूमीत स्त्री शक्तीला व नमन करतो, अशी मराठी सुरुवात त्यांनी केली. महाविकास आघाडीच्या काळात सातत्याने महाराष्ट्राची उपेक्षा झाली. जनादेशाचा आदर न करता केवळ आपण आपल्या स्वार्थाचा, परिवारापुरताच विचार केला गेला. मलिदा खाण्यासाठी महत्वाची पदे घेतली. कमिशन आणा नाहीतर कामावर स्थगिती, या पद्धतीचे राजकारण महाराष्ट्रात चालले.PM Modi on Congress
मुंबईतील नवीन विमानतळ, राज्यातील जलयुक्त शिवार, बळीराजा संजीवनी अशा विविध योजनांच्या कामात तसेच आपण उद्घाटन केलेल्या समृद्धी महामार्गासही त्यांनी विरोध केला. मुंबई मेट्रो, कोकणमधील रिफायनरी, पंतप्रधान आवास अशा विविध प्रश्नांमध्ये कमिशन द्या, अन्यथा स्थगिती या धोरणाने काम चालले, असा थेट हल्लाबोल त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शिवसेनेवर केला.
दुसरीकडे शिंदे- फडणवीस आणि अजितदादाचे सरकार उत्तम पद्धतीने काम करत असून नियत योग्य असल्याने कामही योग्य होत आहे, असे प्रशस्तीपत्र दिले. राम मंदिर आणि संसद भवनासाठी लाकूड पाठविणाऱ्या चंद्रपूरची ख्याती देशभरात पसरली, असा गौरवपूर्ण उल्लेख केला. गेल्या दहा वर्षात मोदींच्या गॅरंटीने वंचित वर्गाला उज्वला गॅस, मोफत शौचालय, मोफत रेशन, पंतप्रधान आवास अशा विविध योजनांचा लाभ झाला. यावर भर दिला.
नक्षलवादग्रस्त गडचिरोली आता पोलाद सिटी होण्याच्या दिशेने अग्रेसर होत असल्याचा आवर्जून उल्लेख केला. चंद्रपूर लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार तर गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज आहेर आदी उपस्थित होते.
#WATCH | Maharashtra: Addressing a public rally in Chandrapur, PM Narendra Modi says, “It is the responsibility of political parties to resolve people’s issues but the Congress Party is the mother of all problems of the country. Start counting from Independence, who was… pic.twitter.com/7wDAIdWIA5
— ANI (@ANI) April 8, 2024
हेही वाचा
Lok sabha election 2024 : PM मोदींच्या ‘मुस्लिम लीग’ वक्तव्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव
PM Modi degree row: PM मोदी शैक्षणिक टिप्पणी प्रकरण: संजय सिंह यांना दिलासा नाहीच
Lok Sabha Election: पंतप्रधान मोदींची पहिली सभा आज विदर्भात
Latest Marathi News काँग्रेस देशापुढील समस्यांची जननी : चंद्रपुरात पीएम मोदींचा हल्लाबोल Brought to You By : Bharat Live News Media.
