केकेआरला दुसरा धक्का, रघुवंशी बाद

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 22 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकत्ता नाइट रायडर्स यांच्यात चेन्नईचे होम ग्राउंड असलेल्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात सीएसकेने टॉस जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. केकेआरची धावसंख्या 6 षटकांत 1 बाद 56 अशी आहे.
केकेआरला दुसरा धक्का
अंगकृष्ण रघुवंशीच्या रुपात केकेआरला दुसरा धक्का बसला. त्याला रविंद्र जडेजाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि पायचित बाद केले. रघुवंशीने 18 चेंडूत 24 धावा केल्या.
नरेन-रघुवंशी यांनी केकेआरचा डाव सांभाळला
पहिल्या चेंडूवर फिल सॉल्ट बाद झाल्यानंतर सुनील नरेन आणि अंगकृष रघुवंशी यांनी केकेआरचा डाव सांभाळला. दोघांनी देशपांडे आणि शार्दुल ठाकूर यांची गोलंदाजी फोडून काढली.
पहिल्या चेंडूवर फिल सॉल्ट बाद
कोलकाता नाईट रायडर्सला पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टच्या रूपाने धक्का बसला. केकेआरच्या सलामीवीर सॉल्टला तुषार देशपांडेने खाते न उघडता तंबूत धाडले.
चेन्नई संघात दोन बदल करण्यात आलेले आहेत. दिपक चहर, शिवम दुबे यांना बाहेर बसवले आहे. त्यांच्या जागी मुस्तफिजूर रहमान आणि शार्दुल ठाकुरचे पुनरागमन झाले आहे. तर समीर रिजवीला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे केकेआरने आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Latest Marathi News केकेआरला दुसरा धक्का, रघुवंशी बाद Brought to You By : Bharat Live News Media.
