वाशिम: ग्राम शेलूबाजार येथून छापा टाकून ३ लाखांचा गुटखा जप्त

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : मंगरूळपीर हद्दीतील ग्राम शेलूबाजार, ग्रामलाठी येथे धाड टाकून ३ लाख ५१ हजार ६४४ रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला. या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. ही कारवाई वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने रविवारी (दि.७) रात्री करण्यात आली. ग्रामलाठी येथे शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा व पान मसाला अवैधपणे साठवल्याची गोपनीय … The post वाशिम: ग्राम शेलूबाजार येथून छापा टाकून ३ लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

वाशिम: ग्राम शेलूबाजार येथून छापा टाकून ३ लाखांचा गुटखा जप्त

वाशिम: Bharat Live News Media वृत्तसेवा : मंगरूळपीर हद्दीतील ग्राम शेलूबाजार, ग्रामलाठी येथे धाड टाकून ३ लाख ५१ हजार ६४४ रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला. या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. ही कारवाई वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने रविवारी (दि.७) रात्री करण्यात आली.
ग्रामलाठी येथे शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा व पान मसाला अवैधपणे साठवल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ३ लाख ५१ हजार ६४४ रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे, दीपक सोनवणे, अमोल इंगोले, प्रविण राऊत, विठ्ठल सुर्वे, तेजस्विनी खोडके, संदिप डाखोरे यांनी केली.
हेही वाचा 

Lok Sabha Election 2024 : यवतमाळ-वाशिममध्ये ‘वंचित आघाडी’ निवडणूक रिंगणातून बाहेर; आता पाठिंबा कोणाला?
वाशिम: पन्हाळा खू. येथे स्थिर सर्वक्षण पथकाकडून ३ लाख जप्त
वाशिम: रिसोडमधून मजुरांचे रोजगारासाठी स्थलांतर; वाड्या-वस्त्या ओसाड

Latest Marathi News वाशिम: ग्राम शेलूबाजार येथून छापा टाकून ३ लाखांचा गुटखा जप्त Brought to You By : Bharat Live News Media.