१८ वर्षांचे नातं संपुष्टात; ऐश्वर्या रजनीकांत-धनुषकडून घटस्फोटासाठी अर्ज दाखल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत (Aishwarya Rajinikanth-Dhanush ) आणि अभिनेता धनुष (Dhanush) पुन्हा एकदा वैयक्तिक जीवनाविषयी चर्चेत आहेत. २०२२ मध्ये त्यांनी नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला होता. आता दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. (Aishwarya Rajinikanth-Dhanush )
ऐश्वर्या रजनीकांत आणि धनुष यांचे २००४ साली लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. मात्र, लग्नाच्या १८ वर्षानंतर जानेवारी २०२२ मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय केला. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी धक्काच बसला. रिपोर्टनुसार, अभिनेता धनुष आणि चित्रपट निर्माता ऐश्वर्या रजनीकांत यांनी चेन्नई कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. दोघे विभक्त का होताहेत, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
२०२२ मध्ये धनुषने एक्स अकाऊंटवर एक नोटमध्ये लिहिलं होतं – ‘आम्ही १८ वर्षे मित्र, कपल, पॅरेंट्स आणि वेल विशर म्हणून वेळ घालवला. आज आम्ही आमचे मार्ग वेगळे करत आहोत. आम्ही एका कपलच्या भूमिकेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे…’
Latest Marathi News १८ वर्षांचे नातं संपुष्टात; ऐश्वर्या रजनीकांत-धनुषकडून घटस्फोटासाठी अर्ज दाखल Brought to You By : Bharat Live News Media.
