धोनीच्या संघात होणार मोठा बदल, ‘अशी’ असू शकते CSK-KKRची प्लेइंग 11

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 CSK vs KKR : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामातील सामना क्रमांक-22 मध्ये सोमवारी (8 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्जचा लढत कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. केकेआरने तिन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, सीएसकेने चारपैकी दोन सामने जिंकले आहेत. … The post धोनीच्या संघात होणार मोठा बदल, ‘अशी’ असू शकते CSK-KKRची प्लेइंग 11 appeared first on पुढारी.

धोनीच्या संघात होणार मोठा बदल, ‘अशी’ असू शकते CSK-KKRची प्लेइंग 11

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : IPL 2024 CSK vs KKR : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामातील सामना क्रमांक-22 मध्ये सोमवारी (8 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्जचा लढत कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. केकेआरने तिन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, सीएसकेने चारपैकी दोन सामने जिंकले आहेत. सीएसकेचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे, तर एसआरएचची जबाबदारी पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
मुस्तफिजूरचे पुनरागमन होणार?
या सामन्यात दोन्ही संघ प्लेइंग-11 ची निवड अचूकपणे करेल. सीएसके संघात काही बदल होऊ शकतात. मथिशा पाथिराना किरकोळ दुखापतीमुळे या आधीचा सामना खेळू शकला नाही. तर मुस्तफिजुर रहमान व्हिसा संबंधित समस्यांमुळे बांगला देशला गेला आहे. या आधीच्या सामन्यासाठी तोही उपलब्ध नव्हता. या सामन्यात मुस्तफिजुर खेळू शकेल अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे केकेआरच्या इलेव्हनमध्येही बदल पाहायला मिळेल. नितीश राणाचे पुनरागमन जवळपास निश्चित झाले आहे. त्याचवेळी शेवटच्या सामन्यात गोलंदाजी न करणारा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याचे संघातील स्थान डळमळीत आहे.
सीएसके आणि केकेआर यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 29 सामने खेळले गेले आहेत. यातील 18 सामने CSK ने तर 10 सामने KKR ने जिंकले आहेत. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. चेपॉकमध्ये दोन्ही संघांमध्ये 10 सामने झाले आहेत, ज्यातील सीएसकेने 7 जिंकले आहेत.
सलग दोन पराभव होऊनही सीएसके संघावर कोणतेही दडपण नसून संघाच्या कमकुवतपणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाकडून केला जाईल. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांना आपल्या खेळात सुधारणा करून पॉवर प्लेमध्ये सुपर किंग्जला चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. सध्याच्या स्पर्धेत सीएसकेचा सर्वात यशस्वी फलंदाज शिवम दुबे आहे. त्याने 160.86 च्या स्ट्राइक रेटने 148 धावा केल्या आहेत.
या सामन्यात लोअर मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजीला येणाऱ्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवरही नजर असेल. वेगवान गोलंदाजीत दीपक चहर, तुषार देशपांडे आणि मुकेश चौधरी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असेल, तर फिरकी विभागात मोईन अली, रवींद्र जडेजा आणि महेश तिक्षाना यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी असेल. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहेत. दोन्ही संघांना फलंदाजीच्या निर्भय कामगिरीचा फायदा झाला आहे.
नरेन पुन्हा खळबळ माजवेल का?
सुनील नरेनला डावाची सुरुवात करणे केकेआरसाठी फायदेशीर ठरत आहे. केकेआरचा सर्वात यशस्वी फलंदाज नरेनला चालू मोसमाच्या सुरुवातीला पॅव्हेलियनमध्ये पाठवणे सीएसकेच्या गोलंदाजांसमोर मोठे आव्हान असेल. फिल सॉल्टनेही डावाची सुरुवात करताना नरेनला चांगली साथ दिली आहे.
मधल्या फळीत कर्णधार श्रेयस अय्यर आणि रमणदीप सिंग यांना अधिक सातत्य दाखवावे लागेल, तर आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांनी आतापर्यंत छाप पाडली आहे. हर्षित राणा, रसेल आणि वैभव अरोरा यांनी गोलंदाजीत केकेआरसाठी चांगली कामगिरी केली आहे, तर मिचेल स्टार्क आणि वरुण चक्रवर्ती देखील पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर हळूहळू लय मिळवत आहेत. चेपॉकच्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा भरपूर धावा होण्याची अपेक्षा आहे.
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेइंग-11
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, डॅरिल मिशेल, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुकेश चौधरी, मुकेश चौधरी.
इम्पॅक्ट प्लेअर : समीर रिझवी.
कोलकाता नाईट रायडर्सची संभाव्य प्लेइंग-11
सुनील नरेन, फिल सॉल्ट, अंगकृष रघुवंशी/नितीश राणा, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट प्लेअर : सुयश शर्मा/अनुकुल रॉय
The post धोनीच्या संघात होणार मोठा बदल, ‘अशी’ असू शकते CSK-KKRची प्लेइंग 11 appeared first on Bharat Live News Media.