ठरलं तर मग, अबोली प्रेमाची गोष्ट मालिकेत पाडव्याचा गोडवा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ठरलं तर मग, सुख म्हणजे नक्की काय असतं, अबोली, घरोघरी मातीच्या चुली, लक्ष्मीच्या पाऊलांनी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे. लक्ष्मीच्या पाऊलांनी मधील अद्वैत-कला आणि प्रेमाची गोष्टमधील मुक्ता सागरचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा असल्याने दोन्ही जोड्यांसाठी यंदाचा गुढीपाडवा खास असणार आहे.
घरोघरी मातीच्या चुलीमध्ये १५ वर्षांनंतर रणदिवे आणि विखे-पाटील कुटुंब एकत्र गुढी उभारणार आहेत. सौमित्र आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर सयाजीरावांनी एकत्र गुढी उभारण्यास सहमती दिली आहे. पाडव्याच्या गोडव्याप्रमाणे दोन्ही कुटुंबांमधला नात्याचा गोडवाही वाढेल का, हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.
सुख म्हणजे नक्की काय असतंमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी शालिनी आणि नित्या पहिल्यांदा एकमेकींसमोर येणार आहेत. शालिनीच्या पापांचा घडा आता भरलाय. त्यामुळे हा गुढीपाडवा शालिनीसाठी नवा धमाका घेऊन येणार आहे.
ठरलं तर मग आणि अबोली मालिकेतही कलाकारांनी जल्लोषात गुढी उभारली आहे.
Latest Marathi News ठरलं तर मग, अबोली प्रेमाची गोष्ट मालिकेत पाडव्याचा गोडवा Brought to You By : Bharat Live News Media.
