यवतमाळ-वाशीम लोकसभेच्या वंचितचा उमेदवारी अर्ज कोर्टाने फेटाळला

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार अभिजीत राठोड यांनी नामनिर्देशनपत्र रद्द झाल्याच्या निर्णयाविरुद्ध याचिका आज हायकोर्टाकडून फेटाळण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे अभिजीत राठोड यांनी यवतमाळ वाशीम लोकसभा करिता नामांकन अर्ज दाखल केला. मात्र त्यामध्ये काही त्रुटी आढळल्याने छाननीत अर्ज बाद ठरवण्यात आला होता. त्यानंतर राठोड यांनी दाखल केलेल्या नामांकन अर्जामधील काही रकाने … The post यवतमाळ-वाशीम लोकसभेच्या वंचितचा उमेदवारी अर्ज कोर्टाने फेटाळला appeared first on पुढारी.

यवतमाळ-वाशीम लोकसभेच्या वंचितचा उमेदवारी अर्ज कोर्टाने फेटाळला

वाशीम; Bharat Live News Media वृत्तसेवा : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार अभिजीत राठोड यांनी नामनिर्देशनपत्र रद्द झाल्याच्या निर्णयाविरुद्ध याचिका आज हायकोर्टाकडून फेटाळण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे अभिजीत राठोड यांनी यवतमाळ वाशीम लोकसभा करिता नामांकन अर्ज दाखल केला. मात्र त्यामध्ये काही त्रुटी आढळल्याने छाननीत अर्ज बाद ठरवण्यात आला होता. त्यानंतर राठोड यांनी दाखल केलेल्या नामांकन अर्जामधील काही रकाने रिकामे असल्याचे त्यांना छाननीच्या दिवशी सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांच नामांकन रद्द करण्यात आले. या विरोधात त्यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली होती, मात्र त्यांची याचिका आज (दि. ८) फेटाळण्यात आली.
Latest Marathi News यवतमाळ-वाशीम लोकसभेच्या वंचितचा उमेदवारी अर्ज कोर्टाने फेटाळला Brought to You By : Bharat Live News Media.