Pushpa 2 Teaser : स्वॅगमध्ये आला अल्लू अर्जुन, जत्रा लूक व्हायरल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अल्लू अर्जुनच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘पुष्पा २’ चा धमाकेदार टीजर रिलीज झाला आहे. यामध्ये पुष्पा राजच्या अवतारात अल्लू अर्जुनचा स्वॅग दिसत आहे. आज अल्लू अर्जुनच्या वाढदिवसादिवशी निर्मात्यांनी पुष्पा २ चा ग्रँड टीजर (Pushpa 2 Teaser) रिलीज केला आहे. आज सकाळी ११ वाजून ७ मिनिटांना टीजर रिलीजची घोषणा झाली होती. अल्लू अर्जुनने आपले वचन पूर्ण करत दमदार टीजर सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं. टीजरमध्ये अल्लू अर्जुन साडी नेसलेली दिसतो. साडी नेसून तो गुंडांना मारताना दिसतो. अभिनेत्री रश्मिका मंदाना पुष्पा राजची पत्नी श्रीवल्लीच्या भूमिकेत वापसी करेल. (Pushpa 2 Teaser)
अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून फॅन्सला म्हटले की, I thank each and everyone of you for the birthday wishes! My heart is full of gratitude. Please take this teaser as my way of saying thank you! 🎁 #Pushpa2TheRule
Latest Marathi News Pushpa 2 Teaser : स्वॅगमध्ये आला अल्लू अर्जुन, जत्रा लूक व्हायरल Brought to You By : Bharat Live News Media.
