सोन्याने मोडले सर्व रेकॉर्ड, पहिल्यांदाच ७१ हजार पार, चांदीही महागली

पुढारी ऑनलाईन : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी केली जाते. पण त्याआधीच सोमवारी (दि.८) सोने दराने नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला. आज सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ७१,०६४ रुपयांवर गेला. ५ एप्रिल रोजी शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६९,८८२ रुपयांवर बंद झाला होता. त्यात आज ८ एप्रिल रोजी प्रति १० ग्रॅम मागे १,१८२ रुपयांची वाढ झाली. … The post सोन्याने मोडले सर्व रेकॉर्ड, पहिल्यांदाच ७१ हजार पार, चांदीही महागली appeared first on पुढारी.

सोन्याने मोडले सर्व रेकॉर्ड, पहिल्यांदाच ७१ हजार पार, चांदीही महागली

Bharat Live News Media ऑनलाईन : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी केली जाते. पण त्याआधीच सोमवारी (दि.८) सोने दराने नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला. आज सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ७१,०६४ रुपयांवर गेला. ५ एप्रिल रोजी शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६९,८८२ रुपयांवर बंद झाला होता. त्यात आज ८ एप्रिल रोजी प्रति १० ग्रॅम मागे १,१८२ रुपयांची वाढ झाली. तर चांदीचा दर प्रति किलो २,२८७ रुपयांनी वाढून ८१,३८३ रुपयांवर पोहोचला आहे. (Gold Price Today)
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, सोमवारी शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ७१,०६४ रुपये, २२ कॅरेट ६५,०९५ रुपये, १८ कॅरेट ५३,२९८ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४१,५७२ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ८१,३८३ रुपयांवर खुला झाला आहे.
दरम्यान, आज एमसीएक्सवर (MCX) वर सोन्याचा दर ४४० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ७१,०८० रुपयांवर गेला. दरम्यान, चांदीचा दर सुमारे १ हजार रुपयांनी वाढून दर प्रति किलो ८२,०६४ रुपयांवर पोहोचला. चांदीच्या दरात १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. डॉलर इंडेक्स (DXY) मध्ये घसरण झाल्यामुळे सोने दरात तेजी आली आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये डॉलर इंडेक्स ०.७३ टक्क्यांनी खाली आला आहे.
गेल्या आठवड्यात, MCX वर जून गोल्ड फ्युचर्सने प्रति १० ग्रॅम ७०,६९९ रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. दरम्यान, मे चांदी फ्युचर्सने सप्ताहाअखेर प्रति किलो ८१,०३० रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता.
शुद्ध सोने कसे ओळखाल?
सराफा बाजारात २४ कॅरेट हे शुद्ध सोने समजले जाते. पण, दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे नमूद केलेले असते. (Gold Price Today)

#Gold and #Silver opening #Rates for 08/04/2024
For more details contact: Saurabh +91 9004120120 / 022- 49098950 / 022- 49098960
Follow us on Twitter : https://t.co/lXovVzctug
Follow us on Instagram : https://t.co/ZOr2uGknFc
Follow us on Facebook : https://t.co/9tJn5720rk… pic.twitter.com/AI4tI0inzs
— IBJA (@IBJA1919) April 8, 2024

हे ही वाचा :

शेअर बाजारातील तेजीचा वारू उधळला! BSE बाजार भांडवल पहिल्यांदाच ४०० लाख कोटींवर
सुवर्ण उच्चांक… आता पुढे काय ?
सेन्सेक्स- निफ्टी लाईफ टाईम हाय, ‘या’ शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

 
 
Latest Marathi News सोन्याने मोडले सर्व रेकॉर्ड, पहिल्यांदाच ७१ हजार पार, चांदीही महागली Brought to You By : Bharat Live News Media.